सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत कलम 37 (3) अन्वये आदेश लागू

0

सोलापूर दि.12 : सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्यीत शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच समाजकंटक व गुंडप्रवृत्ती इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे जावे यासाठी दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 08.00 वाजलेपासून 15 दिवस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम (37)3 च्या आदेशाचा अंमल दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 20.00 वा संपुष्टात येत आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम (37)3 अन्वये शमा पवार अपर जिल्हादंडाधिकारी सोलापूर, सोलापूरयांनी ग्रामीण जिल्ह्याच्या हद्यीत (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्य वगळून) दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजीचे सकाळी 08.00 वाजले पासून ते दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजीच्या रात्री 20.00 वा पर्यंत पाच किंवा पाचहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालत आहे.

हा हुकुम अत्यावश्यक सेवा, सरकारी कामकाज बजावणाऱ्या यंत्रणांना लागू होणार नाही, तसेच ज्या प्रकरणी जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी पूर्व परवानगी दिली आहे अशा यात्रास्थळे व तत्सम प्रकरणांपुरते लागू होणार नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here