सोलापूर,दि.१६: तथाकथित शिवशाहीर ब.मो.पुरंदरे यांच्या अस्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील ११ गड किल्ल्यांवर विसर्जित करण्याची भुमिका मनसेचे राज ठाकरे यांनी घेतलेली आहे. त्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध असून त्याबाबतचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे ईमेल द्वारे पाठवले आहे.
ब.मो.पुरंदरे यांनी त्यांच्या राजाशिवछत्रपती या कादंबरीमध्ये छत्रपती घराण्याची,राजमाता जिजाऊंची व शेतकरी – कुणबी स्त्रीयांसह समस्त बहुजन समाजाची अत्यंत संपातजनक बदनामी केलेली आहे.त्यासंदर्भात त्यांचे विरोधात कोर्टामध्ये १ कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा ही दाखल आहे.तसेच,त्यांच्या याच लिखानामुळे त्यांना मागील फडणवीस सरकारने महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहिर केल्यानंतर राज्यातील हजारो ग्रामपंचायतींनी ठरावा द्वारे सदर पुरस्कारास विरोध दर्शवला होता.तसेच,राज्यामध्ये या पुरस्कारा विरोधात बहुजन समाजाने आक्रमक होत शिवसन्मान परिषदा आयोजित करुन निषेध नोंदवलेला होता.बहुजन समाजाच्या विरोधामुळेच पुरंदरेंना अरबी समुद्रामधील नियोजित शिवस्मारक समितीवरुन हटवण्यात आलेले होते.पुरंदरेंबद्दल बहुजन समाजाच्या भावना प्रचंड तिव्र विरोधी आहेत.याचाच प्रत्यक्ष त्यांच्या मृत्युनंतर महाराष्ट्रातील गावागावांमध्ये लोकांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलेला आहे.
अशा वादग्रस्त व बहुजन विरोधी,आर एस एसचे स्वयंसेवक असलेल्या ब.मो.पुरंदरेंच्या अस्थी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील गडांवर विसर्जित करण्यास आमचा तिव्र विरोध आहे. महाराष्ट्र शासनाने मनसे प्रमुख नेत्यांना व पुरंदरे समर्थकांना सदर कृत्य करण्यापासून रोखावे.अन्यथा, राज्यामध्ये या प्रकारामुळे कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसे झाल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार असतील, यांची नोंद घ्यावी.
याउपर ब. मो. पुरंदरेंच्या अस्थी स्वराज्यातील कोणत्याही गडावर विसर्जित करण्यात आल्यास त्या त्या गडांवरुन ब.मो.पुरंदरेंच्या पुतळ्याचा कडेलोट करण्यात येईल. व झालेल्या प्रकाराबद्दल तीव्र आंदोलन करण्यात येइल. याची ही नोंद घ्यावी. तद्नंतर निर्माण होणार्या परिस्थितीस महाराष्ट्र शासन पुर्णपणे जबाबदार राहिल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.