बेरोजगार उमेदवारांसाठी 25, 26, 27 मे रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

0

सोलापूर,दि.24 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यातर्फे 25,26 आणि 27 मे 2022 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. रोजगार मेळाव्यात ट्रेनी, फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंटेशन, एम.डी.आर.टी. विमा प्रतिनिधी, 10 वी पास/नापास, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर, बी.एस.सी. केमेस्ट्री / एम.एस.सी. केमेस्ट्री इत्यादी 247 रिक्तपदे चार उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचीत केली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स अथवा टेलिफोन याद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे, याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा solapurrojgar1@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here