सोलापूर,दि.२६: एक लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी मुख्याध्यापक विजयसिंह गणपती पुजारी यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश पांढरे यांनी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्तता केली.
पुजारी हे जवाहर ग्रामविकास मंडळ संस्थेंतर्गत वाळूज प्रशाला (ता. मोहोळ) येथे मुख्याध्यापकपदी तर रोहित जनार्दन कादे सदर संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते. संस्थेमध्ये कनिष्ठ लिपिक पदावर अनुकंपा तत्त्वावर नेमणूक करण्याकरिता फिर्यादीच्याबाजूने उच्च न्यायालयामध्ये प्रस्ताव सादर करण्याकरिता ठरविलेल्या १४ लाख रुपयांपैकी उर्वरित पाच लाखांची मागणी आरापीने केली व त्यापैकी एक लाख रुपये सोलापूर येथे देण्याचे ठरले. त्याप्रमाणे पुजारी यास फिर्यादीकडून एक लाख रुपये लाच म्हणून घेताना रंगेहात पकडले होते. आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात आले व जामिनाचा अर्ज दाखल केला.
न्यायालयाने आरोपीची जामिनावर मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. पांडुरंग काळुके व ॲड. राकेश कुपवाह यांनी काम पाहिले.