कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले आदेश

0

हाँटेल, रेस्टॉरंटना रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी

सोलापुर,दि.२१: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे शहरातील दुकाने २२ आँक्टोंबरपासुन रात्री अकरापर्यंत आणि हाँटेल मध्यरात्री बारापर्यंत सुरु ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबतचे आदेश काढले. (The shops were allowed to remain open till eleven o’clock at night and the hotel till midnight)

राज्यातील ठाकरे सरकारने यापूर्वीच निर्देश जारी केले आहेत. दिवाळीचा सण तोंडावर असल्याने दुकानांची वेळ वाढवुन देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. चेंबर आँफ काँमर्सने महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हाँटेल व्यावसायीकांनीही आनंद व्यक्त केला आहे.

कोरोनामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. रुग्ण संख्या अटोक्यात आल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. गेल्या काही दिवसांत शहरात एक आकडी रुग्ण संख्या असुन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट रात्री १२ पर्यंत तर अन्य दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली.

महापालिकेने निर्बंध शिथिल केले असले तरी शासनाने घालून दिलेली कोरोनाची मार्गदर्शक तत्वे पाळणे प्रत्येकाला बंधनकारक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. लसीकरणाचे दोन्ही डोस लवकरात लवकर घेतले पाहिजे. मास्क, सोशल डिस्टन्स, स्वच्छता, गर्दी करणे आणि गर्दीत जाणे टाळणे याबाबतीत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे असेही खोराटे यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेला गती येईल
शासन आणि महापालिका यांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे.या निर्णयाचा रिटेल व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. वेळ वाढवून मिळाल्याने बाजारपेठेतील एकाच ठिकाणी होणारी गर्दी आता दिसणार नाही. दिवाळी तोंडावर आहे. रात्री उशिरापर्यंत लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. याचा फायदा छोट्या विक्रेत्यांना होईल.यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल.
राजु राठी, अध्यक्ष चेंबर आँफ काँमर्स


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here