Omicron Variant: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला हा निर्णय

0

सोलापूर: No Vaccine No Patrol: सोलापूर शहर व जिल्ह्यात ज्यांनी लस (Vaccine) घेतली नाही त्यांना पेट्रोल व डिझेल मिळणार नाही. (No Vaccine No Patrol)महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळत असल्याने राज्यात सतर्कता बाळगण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मात्र नागरिकांकडून काही जिल्ह्यात अजून तितकासा प्रतिसाद मिळत नाही. यासाठी स्थानिक पातळीवर यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सोलापूर शहर व जिल्ह्यात लसीकरण (Vaccination) सुरू आहे. सोलापूर शहर,जिल्ह्यात पहिला डोस न घेतलेले अद्याप 6 लाख नागरिक आहेत. यामध्ये 18 ते 35 वयोगटातील चार लाखांहून अधिक जणांचा समावेश आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ज्यांनी लस घेतली नाही त्यांना आता पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जाणार नाही. शिवाय अधिक गर्दी असलेल्या 6 पेट्रोलपंपावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी शहर, जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे.

यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लसीचे दोन डोस देणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. प्रती दिन लस घेणाऱ्या नागरिकांचा आकडा 60 हजारांवर आहे. तरीही 4 लाखांहून अधिक असलेला तरुण वर्ग अद्याप लस घेत नाही. यामुळे आता पेट्रोल पंपावर लस घेतली असेल तरच पेट्रोल दिले जाणार आहे.

आजपासून होणार अंबलबजावणी

लस न दिल्याने काही पेट्रोल पंपावर नागरिकांनी वादाच्या घटना घडल्या होत्या. यामुळे मंगळवारपासून प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जे नागरिक लस न घेता पेट्रोल मागतात, न दिल्यास वाद घालतात त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. ज्या पंपावर लस न घेतलेल्या वाहनधारकांना पेट्रोल दिले जात आहे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय त्याच ठिकाणी लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.

धान्य वितरण

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना धान्य देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येकांकडील प्रमाणपत्र पाहूनच धान्याचे वितरण केले जात आहे. कुटुंबातील ज्या सदस्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनाच धान्य दिले जात आहे. इतरांना परत पाठविले जात आहे. याचा धान्य वितरणावर फारसा परिणाम झाला नसल्याचे पुरवठा अधिकारी लांडगे यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here