Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंट, आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला पाठवले तातडीचं पत्र

0

‘आमच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करा’: महाराष्ट्र सरकारच्या वेगळ्या कोविड मार्गदर्शक तत्त्वावर आरोग्य मंत्रालय संतप्त

नवी दिल्ली,दि.1: ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाचा नवीन प्रकार पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या कोविडशी संबंधित स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वांवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी देशभरात एकच मार्गदर्शक तत्त्वे असावीत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले, ज्यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी, असे म्हटले होते. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबतची नवी मार्गदर्शक तत्त्वे आजपासून लागू होत असताना हे पत्र लिहिले आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांव्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने स्वतःची मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार मुंबई विमानतळावर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची RTPCR चाचणी आवश्यक आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात येईल. आरटी-पीसीआर चाचणीत नकारात्मक अहवाल आला तरीही होम क्वारंटाइन आवश्यक आहे. इतर राज्यांतून महाराष्ट्रात जाणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांसाठी, प्रवासाच्या तारखेच्या 48 तास आधी नकारात्मक आरटी पीसीआर चाचणी आवश्यक असेल.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना तातडीचे पत्र लिहिले असून त्यात राज्याने विमान प्रवाशांबाबात आखलेल्या नियमावलीवर आक्षेप घेतला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबंकल्याण मंत्रालयाने ज्या गाइडलाइन्स ठरवल्या आहेत त्याच गाइडलाइन्स राज्यस्तरावर अमलात आणाव्या. तसा बदल आपण तातडीने करावा व नव्याने गाइडलाइन्स जाहीर करण्यात याव्यात. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे. भूषण यांनी यात मुंबई विमानतळासाठी विशेष सूचना केल्या आहेत.

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा भारतात एकही रुग्ण आढळलेला नसला तरी विदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचा ओघ कायम आहे आणि त्यात कोरोना बाधित प्रवासीही आढळत आहेत. युरोपमधून मंगळवारी दिल्लीत दाखल झालेल्या चार प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी चार प्रवासी कोरोनाबाधित आढळले ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच केंद्र सरकारकडून अधिक दक्षता बाळगण्यात येत आहे. त्यातही आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांबाबत केंद्राच्या गाइडलाइन्स नुसारच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गाइडलाइन्स असाव्यात, यासाठी आग्रह धरण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र सरकारशी तातडीने केंद्राने पत्रव्यवहार केला आहे.

केंद्राने राज्याला केल्या या चार सूचना…

  1. विदेशातून मुंबई विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात यावी. तो कोणत्याही देशातून आला असला तरी चाचणी बंधनकारक असेल.
  2. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १४ दिवसांचे सक्तीचे होमक्वारंटाइन असेल. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असली तरीही क्वारंटाइन राहावं लागेल.
  3. मुंबईहून पुढे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तरच विमानतळ सोडू दिले जावे.
  4. परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाकडे किमान 48 तास आधीचा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल हवा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here