Omicron : या महिन्यात ओमिक्रॉनचे रुग्ण देशात डेल्टा वेरियंटपेक्षा अधिक असतील, तज्ज्ञांनी दिला इशारा

0

Omicron India ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्ण अनेक देशात आढळत आहेत. अनेक देशात रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेपासून ते ब्रिटनपर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग पसरला आहे. अशातच आता भारतासाठी तज्ज्ञांनी एक इशारा दिला आहे. भारतात पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसंच ओमिक्रॉनचे रुग्ण देशात डेल्टा वेरियंटपेक्षा अधिक असतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

ओमिक्रॉनचा संसर्ग हा देशात करोनाच्या डेल्टा वेरियंटपेक्षाही अधिक वेगाने पसरू शकतो. यामुळे पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत रुग्णसंख्या वेगाने वाढू शकते. पण ओमिक्रॉनचा संसर्गाने रुग्ण अधिक गंभीर आजारी पडत नाही, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

ओमिक्रॉनसंबंधी एक अभ्यास करण्यात आला आहे. हा आजार स्थानिक स्तरावर वाढतो. पण यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. ओमिक्रॉनचा संसर्ग झाला तरी याने गंभीर आजार होण्याचा धोका कमी आहे, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

भारतात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही ६१ वर गेली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही २८ वर पोहोचली आहे. दिल्लीत ६, राजस्थानमध्ये १७ तर गुजरातमध्ये ४ रुग्ण आढळून आले आहेत.

जगात ७७ देशांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग पसरला आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग हा खूप आहे आणि आतापर्यंत ७७ देशांमध्ये रुग्ण आढळून आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (who) म्हटलं आहे. यामुळे सर्व देशांनी ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी पावलं उचलावीत असं आवाहन who ने केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here