Omicron Cases In India: देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद

0

नवी दिल्ली, दि.१: Omicron Cases In India: कोरोनाचा नवीन व्हेरीयंट ओमिक्रॉन व्हेरीयंटने (Omicron Variant) अनेक देशात कहर केला आहे. भारतातही ओमिक्रॉन व्हेरीयंट रुग्णांची संख्या (Omicron Cases In India) वाढत आहे. आतापर्यंत देशभरात ओमिक्रॉनचे १४३१ रुग्ण आढळले आहेत. पण दिलासादायकबाब म्हणजे त्यापैकी ४८८ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील २३ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा ( omicron cases in maharashtra ) प्रसार झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक एकूण ४५४ रुग्ण आढळलेत आणि दिल्ली ३५१ रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तामिळनाडूमध्ये ११८, गुजरातमध्ये ११५, केरळमध्ये १०९, राजस्थानमध्ये ६९, तेलंगणात ६२, हरयाणामध्ये ३७, कर्नाटकमध्ये ३४, आंध्र प्रदेशात १७, पश्चिम बंगालमध्ये १७, ओडिशामध्ये १४, मध्य प्रदेश ९, उत्तर प्रदेशमध्ये ८, उत्तराखंड ४, चंदीगड ३, जम्मू-काश्मीरमध्ये ३, अंदमान आणि निकोबारमध्ये २, गोव्यात १, हिमाचल प्रदेशमध्ये १, लडाखमध्ये १, मणिपूरमध्ये १ आणि पंजाबमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे.

ओमिक्रॉनचा धोका पाहता अनेक राज्यांनी निर्बंध वाढवण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत करोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत नागरिकांना समुद्रकिनारे, खुली मैदाने, उद्याने, पार्क किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी संध्याकाळी ५ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश १५ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतात लसीकरण मोहीमेचे काम वेगात सुरू आहे. दरम्यान, आता १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना करोनाची लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी आजपासून कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणी सुरू होत आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १४५.१६ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here