Odisha Naba Das: आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याचा गोळीबार

Naba Das: नाबा दास यांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे

0

ओडिशा,दि.29: ओडिशामध्ये राजकारणाला हादरावून सोडणारी घटना घडली आहे. झारसुगुडा जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याने आरोग्य मंत्री नाबा दास (Odisha Naba Das) यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. यामुळे नाबा दास यांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. एका कार्यक्रमात जात असताना पोलीस अधिकारी (ASI) गोपालचंद्र दास (Gopalchandra Das) यांनी कृत्य केले आहे. या घटनेमुळे ओडिशामध्ये खळबळ उडाली आहे. (odisha health minister naba das firing)

पोलीस अधिकाऱ्याने केला गोळीबार | Odisha Naba Das

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नबा दास हे ब्रजराजनगर येथील गांधी चौक इथं एका कार्यक्रमामध्ये चालले होते. त्याचवेळी गोपालचंद्र दास या पोलीस अधिकाऱ्याने (ASI) गोळी झाडली. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. नबा दास यांच्या छातीत गोळी लागली आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने झारसुगुड़ा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

नबा दास कार्यालयाचे करणार होते उद्घाटन | Naba Das

नबा दास हे ब्रजरानगर येथील बीजू जनता दल (बीजद) च्या कार्यालयाचे उद्घाटन करणार होते. वाटेमध्ये गांधी चौक आला. त्यावेळी त्यांनी कारमधून उतरून पायीचे पक्षाच्या कार्यालयाकडे जाणार होते. त्याच वेळी गोपालचंद्र दास या पोलीस इंन्स्पेक्टरने गोळ्या झाडल्या. नबा दास यांना आता झारसुगुड़ा विमानतळावर आणण्यात येणार आहे. तिथून त्यांना भुवनेश्वरला नेण्यात येईल.

पण, राज्याच्या आरोग्य मंत्र्यावर भर चौकात गोळीबाराची घटना कशी घडली. सुरक्षा व्यवस्थेत एवढी मोठी चूक कशी झाली. याबद्दल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

ओडिसा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळाची पाहणी केली आहे. ज्या पोलिसाने गोळीबार केला, त्याची गांधी चौकाच्या पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी लागली होती. त्याने आपल्या सर्व्हिस रिव्हाल्व्हरमधून मंत्री नबा दास यांच्यावर गोळी झाडली. त्याने हे कृत्य का केले, याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. नबा दास यांना तातडीने एअर लिफ्ट करून भुवनेश्वरला पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here