एनसीबी मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार न्यायालयात
दि.6: राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खानला एनसीबीने यावर्षी 13 जानेवारी 2021 रोजी 200 किलो अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल अटक केली होती. परंतु नवाब मलिक यांनी असा दावा केला होता की जप्त केलेली सामग्री “हर्बल तंबाखू” होती. समीरला आठ महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबई झोन अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडून जी सहा ड्रग्ज प्रकरणे SIT कडे वरिष्ठ अधिकारी संजय सिंग (Sanjay Singh) की यांच्याकडे सोपवली आहेत. त्यात महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याही केसचा समावेश आहे.
नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला देण्यात आलेला जामीन रद्द करण्यात यावा यासाठी विशेष तपास पथक (SIT) आता न्यायालयात जाण्याचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे राजकीय वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण मंत्री नवाब मलिक सतत अमली पदार्थ विरोधी एजन्सी आणि तिचे झोनल हेड समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, जामिनाला आव्हान देण्याचा निर्णय गेल्या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आला होता. समीर खान आणि एका अन्य एका ड्रग्ज प्रकरणात आरोपी यांच्यात 20,000 रुपयांच्या ऑनलाइन व्यवहाराचा पुरावा मिळाल्यानंतर एनसीबीने समीर खानला समन्स बजावले होते.
गेल्या महिन्यात NCB ने मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यावर समीर खानचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. यानंतर नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा वर्षाव केला. याअंतर्गत मलिक यांनी वानखेडे यांच्यावर खंडणी, बनावट जात प्रमाणपत्र मिळवून देणे आणि शाहरुख खानला गोवण्यासाठी बनावट केस केल्याचा आरोप केला होता.