सोलापूर जिल्ह्यातील ५५ गावांच्या सरपंचांना नोटिसा : मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

0

वित्त आयोगाचा निधीही रोखण्याचा निर्णय

सोलापूर,दि.१०: राज्य शासनाच्या आदेशानुसार लसीकरण मोहिमेस (Vaccination Campaign) सहकार्य करुन गावातील लसीकरण (Vaccination) पूर्ण करण्याच्या सूचना देऊनही लसीकरणात मागे राहिलेल्या ५५ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) सरपंचांना (Sarpanch) कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्या असून या गावांना (Villages) देण्यात येणारा वित्त आयोगाचा निधी (Funding of the Finance Commission) रोखण्याचा निर्णय घेतला असल्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Chief Executive Officer Dilip Swami) यांनी सांगितले.

लसीकरणाबाबत (Vaccination) सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) ग्रामपंचायतींना (Gram Panchayat) सूचना देण्यात आल्या होत्या. जी गावे (Villages) लसीकरणात मागे असतील त्या गावांच्या सरपंच आणि सदस्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, जिल्ह्यातील ५५ गावे लसीकरणात मागे राहिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायत अधिनियमामध्ये सरपंचांची कर्तव्ये नमूद केली आहेत. यात साथीच्या रोगात रोग निवारणार्थ सरपंचांची जवाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ही जबाबदारी पार न पाडणाऱ्या सरपंचांचे पद अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. त्यानुसार लसीकरण मोहिमेत कमी प्रतिसाद असलेल्या गावातील सरपंचांना अपात्र का ठरवू नये (Why Sarpanch should not be disqualified) अशा आशयाची नोटीस गटविकास अधिकारी यांच्याकडून बजाविण्यात आली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर हैद्रा, मिरजगी, वऱ्हाणपूर, पितापूर, वाश तालुक्यातील पांगरी, पानगाव, श्रीमंतपिंपरी, कोरफळे, आगळगाव, खांडवी, उपळाई ठोंगे, घानेगाव, नारी, भातंवरे. करमाळा तालुक्यातील उंदरगाव धायखिंडी, बिटरगाव श्री, पॉथवडी, विटरगाव वांगी, निमगाव, आवटी, माढा तालुक्यातील माळेगाव, वडोली, गार अकोले, दहिवली, व्होळे. माळशिरस तालुक्यातील शंकरनगर, तोंडले, खळवे, महाकुंग, हनुमानवाडी. मंगळवेढा तालुक्यातील मानेवाडी, रेववाडी, खडकी, सिध्दकनेरी, नंदूर, ढवळस, दामाजीनगर, हुलजंती, मलेवाडी, मोहोळ तालुक्यातील शेजवाभुळगाव, टाकळी सिकंदर, शेटफळ, वटवटे, अर्जुनसॉड. पंढरपूर तालुक्यातील आंवेचिंचोली, विटे, गोपाळपूर, तनाळी, सांगवी. सांगोला तालुक्यातील नराळेवाडी, निजापूर, आगलावेवाडी, ह. मंगेवाडी, घायटी, डिकसळ, मेथवडे, चिंचाळी, वंडगरवाडी, देवकतेवाडी, वामणी, तरंगेवाडी. उत्तर सोलापूर तालुक्यातील राळेरास, अकोलेकाटी, वांगी, कवठे, दारफळ गावडी व दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर, फताटेवाडी, शिखळ, वडजी, वळसंग, होटगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या सरपंचांना नोटिसा वजाविण्यात आल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here