CJI Chandrachud | न्यायपालिकेवर दबाव नाही, निवडणूक आयोगावर निर्णय याचा पुरावा: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड

0

नवी दिल्ली,दि.18: CJI Chandrachud: इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये पोहोचलेले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड (CJI Dhananjaya Y. Chandrachud) यांनी न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा संदर्भ देत न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, आमच्याकडे खटल्यांचा मोठा अनुशेष आहे आणि त्यातून लोकांचा विश्वासही दिसून येतो. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, जिल्हा न्यायव्यवस्थेतही पायाभूत सुविधांचा अभाव आहे, त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे.

सरकारचा न्यायव्यवस्थेवर कोणताही दबाव नाही | CJI Chandrachud

CJI म्हणाले, ‘न्यायाधीश म्हणून माझ्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत मला कोणीही केसचा निर्णय कसा घ्यावा हे सांगितले नाही.’ कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मला कायदामंत्र्यांशी वाद घालायचे नाही, आमच्या विचारसरणीमध्ये फरक आहे.
सरकारकडून न्यायव्यवस्थेवर कोणताही दबाव नसल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचा निर्णय हा न्यायव्यवस्थेवर कोणताही दबाव नसल्याचा पुरावा असल्याचे सीजेआय चंद्रचूड म्हणाले.

न्यायालयात न्यायाधीश जे काम करतात तो त्यांच्या कामाचा केवळ एक अंश असतो. पण त्यामागेही बराच वेळ न्यायाधीशांना द्यावा लागतो, अशी माहिती देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी दिली आहे. न्यायालयाच्या कामकाजावर बोलत असताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी न्यायालयांवर असलेल्या कामाच्या ताणाची वस्तुस्थिती मांडली.

“आम्ही जे सकाळी साडेदहा ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जे काम करतो तो फक्त आमच्या कामाचा एक हिस्सा असतो. प्रत्येक शनिवारी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आपला आदेश लेखी स्वरुपात आणण्याचं काम करतो. मग रविवारी तोच आदेश पूर्णपणे वाचला जातो. जो त्याला सोमवारी कोर्टात वाचून दाखवायचा असतो. त्यामुळे खरं पाहायचं झालं तर सुप्रीम कोर्टाचा प्रत्येक न्यायाधीश आठवड्याचे सातही दिवस काम करत असतो”, असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here