मुंबई,दि.4: Nita Ambani Video: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा तीन दिवसांचा प्री-वेडिंग फंक्शन संपला आहे. जामनगर, गुजरातमध्ये 1 मार्च 2024 पासून प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू झाले. त्यात देश-विदेशातील अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये खूप उत्साह होता. हळूहळू उत्सवातील चित्रे आणि व्हिडिओ समोर येत आहेत. नीता अंबानींचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्या ‘या देवी सर्वभूतेषु’ वर शानदार नृत्य करताना दिसत आहे. याशिवाय या फंक्शनमधून बॉलिवूड स्टार्सचे सुंदर फोटोही समोर आले आहेत. बघूया…
या समारंभासाठी प्रथमच जामनगरमध्ये 160 आंतरराष्ट्रीय विमानांमधून विदेशी पाहुणे आले होते. अन्यथा जामनगर विमानतळावर दिवसातून पाच ते दहा विमाने उडत होती. दरम्यान या समारंभाचे सर्वात महत्वाचे आकर्षण नीता अंबानी यांचा डान्स परफार्मन्स राहिला. त्यांच्या पारंपारिक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
नीता अंबानी या नृत्य कलेत निपुण आहेत. नीता अंबानी अनेकदा अंबानी फॅमिली फंक्शन्समध्ये तांच्या नृत्याने मंत्रमुग्ध करतात. यावेळी कार्यक्रम होता धाकटा मुलगा अनंत अंबानीचा प्री-वेडिंग सोहळा, तेव्हा त्या कशा मागे राहतील? यावेळीही नीता अंबानी यांनी “या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥” या मंत्राने नीता अंबानी यांच्या नृत्याची सुरुवात झाली. त्यानंतर “विश्वंभरी अखिल विश्व तनी जनेता विद्या धरी वदनमा वसजो विधाता” या भजनावर पारंपारीक भारतीय नृत्य त्यांनी केले. फंक्शनमधून समोर आलेला त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.