मुंबई,दि.१९: भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (Nishikant Dubey On PM Narendra Modi) केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार दुबे यांनी केलेल्या विधानाने अनेकदा वाद निर्माण झाला आहे. नुकतेच त्यांनी हिंदी भाषेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी दुबे चर्चेत असतात.

…तर भाजपा 150 जागाही जिंकू शकणार नाहीः निशिकांत दुबे | Nishikant Dubey On PM Narendra Modi
खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (Narendra Modi)मोठं विधान केलं आहे. दुबे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप संदर्भातच विधान केलं आहे. मोदींना नव्हे तर भाजपला मोदींची गरज असल्याचं थेट विधान निशिकांत दुबे यांनी केलं होतं. जर मोदी चेहरा नसतील तर भाजप 150 जागाही जिंकू शकणार नाही असं थेट विधान निशिकांत दुबे यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपची ही सत्ता मोदींमुळेच असल्याचं दुबे यांनी आपल्या वक्तव्यातून अधोरेखित केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काहीच दिवसांपूर्वी 75 व्या वर्षी निवृत्त होण्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्याचा आधार घेत खासदार निशिकांत दुबे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर दुबेंनी हे उत्तर दिलं आहे.