Night Curfew: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आणखी एका राज्यात नाइट कर्फ्यू लागू

0

Night Curfew: देशात ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्या वाढत आहे. ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची हायलेव्हल मिटिंग झाली होती. केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना केल्या होत्या. केंद्राने राज्यांना सणासुदीच्या आधी स्थानिक निर्बंध लावण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्राने गुरुवारी राज्य सरकारांना सणासुदीच्या आधी स्थानिक निर्बंध लावण्याचा विचार करण्यास सांगितले.

केंद्र सरकारच्या निर्देशानंतर मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारने नाइट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला होता. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेत उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यूपीत २५ डिसेंबरच्या रात्री ११ वाजेपासून नाइट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. हा नाइट कर्फ्यू रात्री ११ वाजेपासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. तसंच लग्न सोहळ्यांमधील उपस्थितीवरही मर्यादा घातली आहे. फक्त लग्नात २०० जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. यासह इतरी सूचना योगी सरकारने जारी केल्या आहेत.

लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोविड प्रोटोकॉलनुसार जास्तीत जास्त २०० नागरिकांच्या सहभागास परवानगी असेल. कार्यक्रमांबाबत आयोजक याबाबत स्थानिक प्रशासनाला कळवतील.

मास्क

बाजारात ‘नो मास्क, नो गुड्स’ असा संदेश देऊन व्यापाऱ्यांना जागरूक केले जाईल. कोणताही दुकानदार मास्कशिवाय ग्राहकाला वस्तू देणार नाही. रस्त्यावर/बाजारात प्रत्येकासाठी मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. पोलीस दल सतत गस्त घालणार आहे.

यूपीच्या सीमेवर होईल तपासणी

पब्लिक ॲड्रेस सिस्टम अधिक प्रभावी केली जाईल. देशाच्या कोणत्याही राज्यातून किंवा विदेशातून उत्तर प्रदेशच्या सीमेवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ट्रेसिंग-टेस्टिंग केली जाईल. बस, रेल्वे आणि विमानतळांवर अतिरिक्त दक्षता घेतली जाईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here