EC On NCP: केंद्रीय निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

0

नवी दिल्ली,दि.10: EC On NCP: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. (NCP News)

निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द | EC On NCP

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे. 2014 नंतरच्या सलग दोन लोकसभा निवडणुका आणि 2019 नंतर 21 पैकी 12 राज्यांच्या विधानसभेत राष्ट्रवादीची कामगिरी लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आहे. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी सहा टक्के मते असतील किंवा लोकसभेच्या निवडणुकीत तीन किंवा जास्त राज्यामध्ये किमान दोन टक्के मते असतील तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच निवडणूक चिन्ह मिळते. त्याशिवाय नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयाला जागा मिळते. निवडणुकीमध्ये दुर्दशन अथवा इतर सार्वजनिक वाहिन्यावर ब्रॉडकॉस्टिंगसाठी वेळ मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर या सर्वासाठी पक्ष अपात्र ठरतात.

पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढताना लोकसभा 2019 चे नियम लक्षात घेतले आहेत. त्यानंतर ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या आहेत. तेथील आकडेवारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षासह तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आलेल्या पक्षांची राष्ट्रीय स्तरावर मतदान टक्केवारी 6% पेक्षा कमी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे या तिन्ही पक्षांना मोठा झटका मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीला(AAP) नव्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. 

राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी AAP ला गुजरात किंवा हिमाचलमध्ये 6% पेक्षा जास्त मत घेण्याची गरज होती. गुजरातमध्ये AAP ला सूमारे 13% मतदान मिळाले. या आकडेवारीच्या जोरावर आप आता राष्ट्रीय पक्ष झाला आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी चार राज्यांमध्ये किमान 6% मतदान मिळायला हवे. AAP ला यापूर्वी दिल्ली, पंजाब आणि गोवामध्ये 6% पेक्षा जास्त मतदान मिळाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here