News | भारताचा पाकिस्तानवर वॉटरस्ट्राइक!

0

मुंबई,दि.२८: News |  भारताने पाकिस्तानवर वॉटरस्ट्राइक केला आहे. २२ एप्रिलला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता. यात निष्पाप लोकांचा जीव गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पाकिस्तानला याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेत सिंधु जल करार रद्द केला.

भारताने कारवाई केल्यानंतर पाकिस्तानने जळफळाट करत या कारवाईकडे युद्ध म्हणून बघितले जाईल असा इशारा दिल्यानंतर भारताने उरी धरणातून जादा पाणी सोडून पाकिस्तानवर वॉटरस्ट्राइक केला. त्यामुळे झेलम नदीला पूर आला असून मुझफ्फराबादमधील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. अक्षरशः पूर आल्यामुळे आणि घरे बुडाल्यामुळे लोक घरे सोडून पळाले. पुरामुळे हाहाकार उडाल्याने पाकिस्तान सरकारने पीओकेत आणीबाणी जाहीर केली असून भारताच्या नावाने आगपाखड सुरू केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here