अक्कलकोट तालुक्यातील नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केला जल्लोष

0

अक्कलकोट,दि.६: अक्कलकोट तालुक्यातील नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जल्लोष केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीसाठी रविवारी ८१.८३ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी नवीन तहसिल कार्यालय येथे मतमोजणी करण्यात आली. विजयी नूतन सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी एकच जल्लोष करीत फटाक्याची आतष बाजी केली.

अक्कलकोट तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीकरिता पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली. यामध्ये गाव व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य विजयी उमेदवार खालील प्रमाणे :

जकापूर : लक्ष्मीबाइ वंटे (सरपंच), सदस्य – कलावती पुजारी, सविता पुजारी, सामबाई मणुरे, मलप्पा पाटील, तुकाराम अगतनळी, शरणव्वा करजगी.

करजगी : विवेकानंद उंबरजे (सरपंच), रवि लिंबोळे, गजा सोमण्णा, प्रमिला कुंभार, शब्बीर पटेल, मोनिका नायकोडी, हिराबाई अनंतपुरे, दस्तगीर गोडीकट, भिमाशंकर चडचण, रेणुका पटेद, बसवराज कोकणे, नागम्मा डबरे, स्वाती धसाडे, बसवराज सवळी, सुषमा येळमेले, मलव्वा नागणसुरे.

केगांव बु : श्रीशैल आहेरवाडी (सरपंच), अश्विनी गुणापुरे, विजयालक्ष्मी दुधनी, रमेश देसाई, भिमाशंकर भंडारकवठे, सातव्वा मडनोळी, रविकांत जमादार, सुधाराणी शिंदे.

केगांव खु : प्रभावती बगले (सरपंच), नागेंद्र बगले, धानम्मा सुतार, राजश्री बिराजदार, इरप्पा हेगरगी, कमलाबाई चपळगे, संतोष मुडवे, सुवर्णा बगले.

म्हैसलगे : सुनिल खेड (सरपंच), संतोष माशाळे, लक्ष्मीबाई देसाई, महादेवी कोळी, मल्लिकार्जुन बिराजदार, अशोक बिराजदार, शोभा देसाई, रामचंद्र शिंगे, जयश्री माशाळे, निंगव्वा औराद.

रामपूर-इटगे : दिलीप कदम (सरपंच), शालनबाई चेंडके, गैनी कोळी, सुगलाबाई बनसोडे, सोमशंकर दिंडोरे, अश्विनी कोणदे, सरुबाई बिराजदार (बिनविरोध), संतोष सुतार.

हसापूर : तुळसाबाई कामाठी (सरपंच), मारुती घटकांबळे, सावित्री घटकांबळे, गौतम घटकांबळे, कृष्णाबाई सदाफुले, गणेश कामाठी, मिनाक्षी शिंदे.

शावळ : नितीन चव्हाण (सरपंच), सिध्दाराम पुजारी, शरणप्पा तडवळ, सरस्वती शिवशरण, विनय शिवशरण, रुपाली पाटील, प्रमिला जाधव, बिरप्पा माळगे, गंगाबाई राठोड, पारुबाई चव्हाण.

कुडल : गुजेव्वा जमादार (सरपंच), पवन पुजारी, शरिफा मुजावर, निंगप्पा जमादार, कलावती शिवशरण, रेवम्मा स्वामी, सुनंदा चव्हाण, जयाबाई बनसोडे.

धारसंग : जगदेवी कोळी (सरपंच), नागेश चाबुकस्वार, महानंदा कांबळे, संतोष कोळी, संतोष पाटील, सुनंदा पुजारी, शैलजा नरोणे, शांताबाई कोळी.

कल्लकर्जाळ : बसलिंगव्वा कोडते (सरपंच), श्रीमंत ईश्वरकट्टी, सिध्दाराम कोळी, रुपाली धुळे, पंडित ईश्वरकट्टी, सलीमा पाटील, भौरम्मा मैंदर्गी, जगदेवी ईश्वरकट्टी, प्रिती ईश्वरकट्टी, निजामोद्दीन बिराजदार.

घुंगरेगांव : सुमन गुरव (सरपंच), अशोक बनसोडे, अंबव्वा बनसोडे, जयंती माने, सचिन बसरगी, अनसाबाई गुरव, सोमनिंग बिराजदार, लक्ष्मी बनसोडे.

जेऊरवाडी : कमलाबाई राठोड (सरपंच), तारु राठोड, वृषाली भालेराव, मीना जाधव, रोहित भालेराव, श्रीदेवी राठोड, विजय भालेराव, सीताबाई चव्हाण.

नन्हेगांव : रेखा पाटील (सरपंच), अजयकुमार गायकवाड, श्वेता बंदीछोडे, मालनी चौधरी, कृष्णा खुडे, जैनबी पठाण, सिद्रामप्पा मंगरुळे, रेखा सोनकांबळे.

दहिटणे : नितीन मोरे (सरपंच), मुलूकसाब शेख, विकी चौधरी, चंद्रकला कांबळे, रुक्मिणी कांबळे, शिवशरण बोळशेट्टी, सत्यवती कोळी, अंबुबाई कटकधोंड, शहनाज मुजावर, गोपाळ क्षिरसागर, सरस्वती चोरमले, श्वेता जाधव.

तळेवाड : सिध्दव्वा खाती (सरपंच), गजानन हिळ्ळी, कस्तुरबा करमल, निर्मला पाटील, माळप्पा हिळ्ळी, भौरेमम्मा रायगोंडे, धर्मण्णा कोटी, संगव्वा शिंगे.

बिंजगेर/हालहळ्ळी (मैं) : विठ्ठल अरवत (सरपंच), देविदास बिराजदार, जनाबाई कोटी, शांताबाई माडबाळ, संतोष धन्नळी, भौरम्मा घोडके, सुरेखा बिरजदार, केसर इटेनवरु, संतोष गायकवाड, यलप्पा पुजारी (बिनविरोध).

कंठेहळ्ळी : दिव्या खेडे (सरपंच), जनाबाई गायकवाड, जैनबी जमादार, गुंडप्पा बिराजदार, गंगाबाई चेंडके, ललिता मकाशे, निर्मला बिराजदार, चंद्रकांत वाघे.

कारखान्यात काम करणारा झाला सरपंच

तालुक्यातील दहिटणे गावचे नितीन मोरे हे सरपंच पदाकरिता विक्रमी मताधिक्याने निवडून आले. गेल्या पाच वर्षापासून नितीन मोरे यांचे सामाजिक कार्य व स्वभाव, याची दखल घेऊन गावकऱ्यांनी एका कारखान्यात चिटबॅाय म्हणून कार्यरत असलेलया युवकाला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसून सन्मान केला आहे. भल्या मोठ्या उद्योगपतींना देखील धूळ चारण्याचे काम नितीन मोरे यांनी केलं. गाव सगळ मामाचं, काहीनी माझ्यासाठी निवडणुकीत काम करुन आशिर्वाद दिले. त्यांच्या ऋणातुन मुक्त होऊ शकणार नाही. गावचा विकास करेन व पुढच्या पाच वर्षाला मला विरोधक कोण राहणार नाही एवढे काम करु असे पत्रकारांशी बोलताना नितीन मोरे यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here