Jitendra Awhad | राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा दिवंगत आनंद दिघे यांच्याबाबत मोठा दावा

Jitendra Awhad | शरद पवारांनी उल्लेख करत आनंद दिघे यांच्याबाबत मोठा दावा

0

ठाणे,दि.11: Jitendra Awhad | राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिवंगत आनंद दिघे (Anand Dighe) यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. NCP leader Jitendra Awad made a big claim about late Anand Dighe जितेंद्र आव्हाड यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणाबाबत खंत व्यक्त केली आहे. आता राजकारणात मैत्री संपली आहे, फक्त स्पर्धा राहिली आहे, अशी उद्वीग्न प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. हे सांगतांना जितेंद्र आव्हाड यांनी एक जुनी आठवण सांगितली. शरद पवारांनी मदत केली नसती तर आनंद दिघे यांच्यावरील टाडा रद्द झाला नसता, असं आव्हाड म्हणाले आहेत.

Jitendra Awhad | काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आनंद दिघे यांना जामीन देण्यासाठी शरद पवारांनी मदत केली, हा ठाण्याचा इतिहास आहे. शरद पवारांनी ठरवलं असतं तर आनंद दिघे टाडाच्या बाहेरच आले नसते. त्यांची जेव्हा सुरक्षा काढली तेव्हा पद्मसिंह पाटील गृहमंत्री होते, तेव्हा आनंद दिघेंनी माझी सुरक्षा काढू नका म्हणून विनंती केली होती. दुसऱ्या दिवशी आनंद दिघेंना होती तशीच सुरक्षा व्यवस्था परत देण्यात आली. याच्यासाठी मोठं मन आणि मोठा अनुभव लागतो, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

Jitendra Awhad | दोस्त दोस्त ना रहा: जितेंद्र आव्हाड

दोस्त दोस्त ना रहा, असं आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले. ठाण्यातल्या मैत्रीतील राजकारण संपलं आहे, आता राजकारणात मैत्री संपली फक्त स्पर्धा राहिली आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली.

मुख्यमंत्र्यांवर जितेंद्र आव्हाड यांनी केली टीका

‘ठाण्यातल्या राजकारणात कधीही महिलांचा उपयोग करून राजकारण केलं जात नव्हतं, पण ते करून दाखवलं या प्रकारामुळे जनतादेखील नाराज आहे,’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ‘मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करून जेवढ्या जणांना जवळ करता येईल तेवढं जवळ करावं, असं मी पहिल्या भाषणात म्हणालो होतो, पण ते दुर्दैवाने जेवढं लांब करता येईल तितकं लांब करत आहेत,’ अशी टीका आव्हाडांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here