राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची एकनाथ शिंदे गटावर खोचक टीका

0

मुंबई,दि.२८: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी एकनाथ शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यावर आमदार रवी राणा यांनी गंभीर आरोप केले होते. अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर खोके घेऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केल्यानंतर दोघांमध्ये सद्या वाद सुरू आहे. राणांच्या आरोपानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक होत त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत आरोप सिद्ध करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले

“बच्चू कडू-रवी राणा वाद ही तर सुरुवात आहे. ज्या आमदारांनी या सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यापैकी बऱ्याच आमदारांमध्ये सध्या नाराजी आहे. तसेच अपक्ष आमदारांमध्येही अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता आता हळू हळू बाहेर यायला लागली आहे. बच्चू कडूंच्या माध्यमातून ही सुरूवात झालेली आहे. यापुढे बरच काही बघायला मिळेल”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आक्रमक झालेल्या आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी रवी राणांविरोधात थेट राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा, अन्यथा आपण कठोर कायदेशीर पावलं उचलणार असल्याचे संकेतही बच्चू कडू यांनी दिले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here