राष्ट्रवादी अजित पवार गटाचा शिवसेना शिंदे गटाला इशारा

0

मुंबई,दि.२०: अजित पवार गटाने शिंदे गटाला इशारा दिला आहे. बारामती लोकसभा मतदार संघावरून राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेनेत (शिंदे गट) तणाव निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे.

अशातच शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. शिवतारे आणि अजित पवार यांचे राजकीय वैर सर्वश्रृत आहे. शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरही पवार यांच्या विरोधात टीका करणे सुरूच ठेवले. शिवतारे यांनी अजित पवार अंहकारी आहेत म्हणत आपण निवडूण लढणार असल्याचे जाहीर केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला इशारा दिला. आनंद परांजपे म्हणाले, आम्हाला कोणत्याही प्रकार महायुतीचे वातावरण गडूळ होईल असं वक्तव्य करायचं नाही. सातत्याने विजय शिवतारे वक्तव्य करत आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांचेच नेते ऐकत नाहीत असा मेसेज जात आहे. शिवसेनेच्या विजय शिवतारे यांच्याकडून सातत्याने बारामती लोकसभा मतदार संघाचे वातावरण खराब करण्याचं काम सुरू आहे, असंही आनंद परांजपे म्हणाले. 

‘लोकसभा मतदार संघात जर महायुतीचा धर्म तोडत राहिले तर शिवसेना ज्या मतदार संघात लढणार आहे, तिथे राष्ट्रवादी महायुतीचा धर्म तोडू शकतात’, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here