नरेंद्र मोदी हे हिंदू बांधवांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत: असदुद्दीन ओवेसी

0

मुंबई,दि.29: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ओवेसी यांनी मुस्लिम समाजामध्ये कंडोम वापरणाऱ्यांचं प्रमाण फार अधिक आहे, असं भाषणादरम्यान म्हटलं आहे. तसेच दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासंदर्भातही मुस्लिम समाज सजग असल्याचं ओवेसींनी नमूद केलं आहे. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे.

“मोदी म्हणतात की मुस्लिम जास्त मुलांना जन्म देतात. नरेंद्र मोदींना सहा भाऊ आहेत. अमित शाहांना सहा बहिणी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांना 10 ते 12 बहिणी आणि भाऊ आहेत,” असं ओवेसींनी शुक्रवारी, 26 एप्रिल रोजी दिलेल्या भाषणामध्ये म्हटलं. मुस्लिम समाजातील जन्मदराचा आलेख हा घसरता असल्याचं केंद्र सरकारच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे असंही ओवेसी म्हणाले.

हिंदू बांधवांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

‘मुस्लिमांमधील जन्मदर घसरत आहे. मात्र नरेंद्र मोदी हे द्वेष पसरवण्यात आणि आपल्या हिंदू बांधवांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या देशात मुस्लिम कधीच बहुसंख्य होणार नाहीत. नरेंद्र मोदीजी अजून किती काळ तुम्ही मुस्लिमांची भिती दाखवत राहणार?’ असा प्रश्न ओवेसींनी उपस्थित केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here