Narendra Modi 3.0: तिसऱ्यांदा घेतली नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ

0

नवी दिल्ली,दि.9: Narendra Modi 3.0: अठराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. येथील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 

तिसऱ्यांदा पंतप्रधान | Narendra Modi 3.0

यासह मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. या निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. त्याच वेळी, त्यांच्या मित्रपक्षांपैकी, टीडीपीने 16 जागा जिंकल्या आहेत आणि जेडीयूने 12 जागा जिंकल्या आहेत. 

पीएम मोदींचा ड्रेस प्रत्येकवेळी चर्चेत असतो. यावेळी शपथविधीप्रसंगी पंतप्रधान मोदींनी पांढरा कुर्ता-पायजमा आणि त्यावर निळ्या रंगाचे जाकीट परिधान केले होते.  

विशेष म्हणजे,यावेळी नरेंद्र मोदींसोबतच 69 खासदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी भारताच्या शेजारील देशांच्या प्रमुखांसह हजारो मोदी समर्थकांनी उपस्थिती होते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर मोदी पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान झाले. यानंतर 17व्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवून ते सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली.  

या सोहळ्यासाठी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here