Nandan Nilekani: इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी WhatsApp वापरत नाहीत, जाणून घ्या कोणते ॲप वापरतात

0

दि.17: जगातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनीचे सह-संस्थापक नंदन निलेकणी (Nandan Nilekani) यांनी त्यांच्या आयफोनची (iPhone) स्क्रीन शेअर केली आहे. आपल्याला माहित आहे का एवढी मोठी कंपनी चालवणारे कोणते ॲप्स वापरतात. चला जाणून घेऊया.

एवढी मोठी आयटी कंपनी चालवणे ही काही छोटी बाब नाही. कंपनी नेहमी चांगले काम करावे यासाठी, नंदन निलेकणी (Nandan Nilekani) यांना नेहमी लक्ष केंद्रित करावे लागते. सामान्य माणसाचा मोबाईल दिसला की त्यात तुम्हाला व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इतर सर्व सोशल मीडिया ॲप्स सापडतील, पण नंदन निलेकणींनी व्हॉट्सॲप आणि फेसबुक चालवताना आपला वेळ वाया घालवला तर एवढी मोठी कंपनी कशी चालवणार? त्यामुळे नंदन कोणत्याही प्रकारचे मेसेजिंग ॲप वापरत नाहीत.

Twitter व्यतिरिक्त कोणतेही सोशल मीडिया ॲप नाही

नंदन नीलेकणी यांनी आपल्या आयफोनची स्क्रीन चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांच्या कॅप्शनमध्ये त्यांनी व्हॉट्सॲप नाही, नोटिफिकेशनची सूचना नाही, फक्त आवश्यक ॲप्स असे लिहिले आहे. त्यांच्या फोनच्या होम स्क्रीननुसार नंदन Uper, Apple TV आणि Infosys Lex सारखे ॲप वापरतात. याशिवाय त्यांच्या फोनमध्ये BHIM ॲप देखील आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here