लखनऊ,दि.23: Nand Kishore Suicide: केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर (Kaushal Kishore) यांचे पुतणे नंद किशोर (Nand Kishore) यांनी बुधवारी गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या दुबग्गा येथील बिगरिया भागात प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करणाऱ्या नंद किशोरने राहत्या घरी गळफास लावून घेतला.(Nand Kishore Suicide)
त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, नंद किशोर यांचा मुलगा विशाल याने सांगितले की, ‘वडील बरेच दिवसांपासून आजारी होते. काही दिवसांपासून ते नैराश्यग्रस्त होते. (Nand Kishore Suicide)
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्र्याचा पुतण्या नंद किशोर याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. आत्महत्येचे कारणही नातेवाईकांना सांगता आले नाही. आता तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
कौशल किशोर सध्या संसदेत मोहनलालगंज लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सध्या ते गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत.
श्रद्धा हत्याकांड प्रकरणाबद्दल केले होते वक्तव्य
कौशल किशोर नुकतेच प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा त्यांनी श्रद्धा हत्याकांडाबद्दल बोलताना सांगितले होते की, सुशिक्षित मुलींनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू नये.
बिहारच्या गयामध्ये केंद्रीय मंत्री कौशल म्हणाले, ‘हे चुकीचे आहे, त्यामुळे कोणीही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू नये. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जाणाऱ्या मुलींनी कोर्टातून पेपर तयार करून घ्यावा. असे नाते म्हणजे मैत्री असते, जे काही दिवस टिकते, नंतर तुटते आणि अशा घटना घडतात.