मुंबई,दि.26: Lingayat Mahamorcha: लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी येत्या रविवारी दि. 29 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई दादर येथील टिळक भवनात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना मुंबई लिंगायत महामोर्चाचे निमंत्रण लिंगायत समन्वय समितीच्या वतीने विजयकुमार हत्तुरे (Vijaykumar Hatture) यांनी दिले.
लिंगायत महामोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा | Lingayat Mahamorcha
यावेळी महा मोर्चाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पाठिंबा दिला असून लिंगायत समाजाच्या सर्व मागण्या शासनाने त्वरित मान्य करावेत असे लेखी पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे नाना पटोले यांनी पाठवले आहे.
अनेक वर्षापासून लिंगायत समाजाच्या मागण्या
गेल्या अनेक वर्षापासून लिंगायत समाज सर्व मागण्यासाठी मोर्चा, आंदोलने करत आहे परंतु राज्य शासन भाजप प्रणित शासन त्यांच्या मागण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. हा लिंगायत समाजावर मोठा अन्याय आहे. मी आपल्या सोबत आहे असे ग्वाही अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे यांना दिली.
मोर्चात धर्मगुरुसह लिंगायत समाजातील नेते मंडळी सहभाग होणार आहेत. या राज्यव्यापी महामोर्चामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व तेलंगणा राज्यातील समाजबांधव लाखोंच्या संख्येने येणार आहेत.