राज्य सरकारचा निर्णय, नमो शेतकरी महासन्मान निधी पहिला हप्ता जमा होणार

0

मुंबई,दि.10: NAMO Shetkari Yojana: राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी पहिला हप्ता जमा होणार आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्या सरकारनेही शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधी देण्याची घोषणा केली होती. याला आज मंजुरी देण्यात आली. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपये जमा केले जाणार आहेत.

NAMO Shetkari Yojana | नमो शेतकरी महासन्मान निधी

दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली होती. परंतू, शेतकऱ्यांना पैसे काही दिले नव्हते.

केंद्र सरकार गेली काही वर्षे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत सहा हजार रुपये देत आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षाला सहा हजार रुपये टाकणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प मांडताना याची घोषणा केली होती. अशा प्रकारे केंद्र आणि राज्य सरकारचे असे मिळून 12 हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

योजनेच्या कार्यान्वनासाठी महाआयटीने सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. राज्यातील 86 लाख 60 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ‘पीएम-किसान’चे निकष आणि संगणकीय माहिती ‘नमो किसान’साठी वापरा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. 

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यंदाच्या बजेटमध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (PM-Kisan Samman Nidhi) या धर्तीवर ही योजना लागू करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here