दिल्लीच्या इंद्रलोकात परिसरात रस्त्यावर नमाज अदा, पोलिस निलंबित

0

नवी दिल्ली,दि.8: दिल्लीतील इंद्रलोक परिसरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याठिकाणी रस्त्यावरच शुक्रवारची नमाज अदा सुरू होती. दरम्यान, एक पोलिस कर्मचारी गैरवर्तन करताना दिसला. पोलीस कर्मचारी नमाज अदा करणाऱ्या तरुणांना लाथा मारताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या या कृतीनंतर घटनास्थळी उपस्थित काही लोक संतप्त झाले आणि गोंधळ सुरू झाला. काही लोक व्हिडिओ बनवत राहिले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिस कर्मचाऱ्याला घेराव घातला. 

पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई

या प्रकरणी डीसीपी उत्तर मनोज मीणा म्हणाले की, तपास गांभीर्याने केला जात आहे. आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोपी पोलिस कर्मचाऱ्यावर आणखी काही कठोर पावले उचलली जातील.  

काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांची टीका

काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांनी हा व्हिडिओ X वर शेअर करून दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रतापगढ़ी यांनी लिहिले आहे की, “नमाज अदा करताना एका व्यक्तीला लाथ मारणाऱ्या या दिल्ली पोलिस जवानाला कदाचित मानवतेची मूलभूत तत्त्वेच समजत नाहीत. या जवानाच्या मनात काय द्वेष भरला आहे, दिल्ली पोलिसांना कारवाई करण्याची विनंती आहे. त्याच्यावर योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करा आणि त्याची सेवा समाप्त करा.”

पोलिस कर्मचाऱ्याला केले निलंबित

व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरुण रस्त्याच्या कडेला नमाज अदा करत असल्याचे दिसत आहे. पोलीस त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस कर्मचाऱ्याने नमाज्यांशी गैरवर्तन केले. पोलिस कर्मचाऱ्याने त्याला लाथ मारल्यानंतर तेथे जमाव जमा झाला आणि सर्वजण पोलीस कर्मचाऱ्याच्या मागे उभे राहिले आणि गोंधळ घालू लागले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here