Naina Kanwal: पोलीस उपनिरिक्षक नैना कंवालला छापल्यानंतर अटक

Naina Kanwal: राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत झाली होती सहभागी

0

मुंबई,दि.८: पोलीस उपनिरिक्षक नैना कंवालला (Naina Kanwal) छापल्यानंतर अटक करण्यात आली आहे. सोशल मीडिया स्टार असलेली पोलीस उप निरिक्षक नैना कंवाल सध्या चर्चेत आली आहे. नैनाला पोलिसांनी अटक केली आहे. छापा टाकल्यानंतर पोलिसांना नैनाच्या घरात अवैध हत्यारे सापडली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी नैनावर कारवाई करत तिला अटक केली.

अपहरण करून खंडणी मागण्याच्या प्रकरणात फरार असलेला संशयित आरोपी सुमीत नांदल याच्या शोधात दिल्ली पोलिसांनी हरीयाणातील एका फ्लॅटवर छापा टाकला होता. दिल्ली पोलिसांनी बेल वाजवताच नैना दरवाजा उघडला. फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा नैनाच्या हातात पोलिसांना अवैध हत्यारं आढळली. पोलिसांना बघितल्याबरोबर नैनाने तिच्याजवळील हत्यारे खिडकीतून बाहेर फेकून दिली. पोलिसांनी ही हत्यारे जप्त करत नैनाला अटक केली आहे. अपहरण केलेल्या आरोपीबरोबर नैनाचे संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Naina Kanwal

नैना कंवाल राजस्थानमधील पोलिसांत उप निरिक्षक म्हणून कार्यरत आहे. दिल्ली पोलिसांनी नैनाला अटक केल्यानंतर राजस्थान पोलिसांकडूनही तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांनी नैनाला निलंबित केलं आहे.

नैना एक कुस्तीपट्टू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने भारताचं नैतृत्व केलं आहे. हरयाणा केसरीची ती सहा वेळा विजेती राहिली आहे. याबरोबरच नैनाने आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. नैना २०२२ मध्ये राजस्थान पोलिसांत रुजू झाली होती. नैना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. वर्दीतील अनेक फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. नैनाला वर्दीतील फोटोंमुळेच लोकप्रियता मिळाली होती. इन्स्टाग्रामवर तिचे २.५ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. नैना काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी झाली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here