Solapur: नागेश ऑर्केस्ट्रा व डान्सबारचा परवाना रद्द

0

सोलापूर,दि.२१: विजयपूर रस्त्यावरील सोरेगाव येथील हॉटेल नागेश आर्केस्ट्रा तसेच डान्स बारचा (Nagesh Orchestra Bar) परवाना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने रद्द करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी दिला आहे.

नागेश आर्केस्ट्रा बार काही नियम व अटीवर चालविण्यास शहर पोलिसांनी परवानगी दिली होती. त्या नियमांचे उल्लघंन करुन डान्स बार आणि आर्केस्ट्रा बार चालविला जात असल्याचे कारवाईतून उघड झाले. २०१८ पासून आजपर्यंत नागेश डान्स बारवर कारवाया झाल्या. परंतु कारवाईनंतर पुन्हा चालकाकडून नियमांना डावलून हॉटेलात छमछम सुरू ठेवण्यात आली होती, असेही कारवाईतून समोर आले आहे.

२९ ऑक्टोबरच्या कारवाईनंतर हॉटेल चालकाने पोलीस आयुक्तालयाला अटींवर हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी मागितली होती. त्याप्रमाणे त्यांना ती देण्यातही आली होती. परंतु ८ डिसेंबर रोजी विशेष पथकाने केलेल्या कारवाईत नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब निदर्शनास आली.

विविध गुन्हे दाखल झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने तसेच सांस्कृतिक कार्य विभागाने ५० टक्के क्षमतेने हॉटेल चालविण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु क्षमतेपेक्षा जास्त लोकांना तेथे प्रवेश देण्यात आला. त्यामुळे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या अंतिम आदेशान्वये आर्केस्ट्रा तसेच डान्स बार चालविण्याचा परवाना रद्द केल्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. धाटे यांनी दिले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here