मुंबई,दि.8: MVA Leaders PC | महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगून महाराष्ट्र तोडला जातोय, 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. महाविकास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद (Mahavikas Aghadi Leaders PC) घेतली. 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्रद्रोही लोकांच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. सातत्याने महाराष्ट्राचा अपमान केला जात आहे. महाराष्ट्राचं अस्तित्व नाकारलं जातयंय, महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगून महाराष्ट्र तोडला जातोय. महाराष्ट्रातून उद्योग पळवून नेले जात आहेत. या सर्वांच्या विरोधात मुंबईतील जिजामाता उद्यानापासून विराट मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackera) यानी दिली.
MVA Leaders PC: महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक
17 डिसेंबंरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची बैठक पार पाडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद (MVA Leaders PC) घेतली. यावेळी 17 डिसेंबरच्या मोर्चाबाबत माहिती देण्यात आली.
MVA Leaders PC: उद्धव ठाकरे यांचा भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. “गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले उद्योग कारणीभूत आहेत. कर्नाटक निवडणूक समोर ठेऊन आता महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतं आहे. महाराष्ट्र प्रेमी आहेत त्या सर्वांना आम्ही मोर्चासाठी बोलवलं आहे. मराठी भाषिकांवर अजुनही कानडी अत्याचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील वाहनांना काळे फासले जात आहे. परंतु, अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, नेता नाही अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रानेचे नेहमी संयम पाळायचा का? राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी संसदेत याविरोधात आवाज उठवला. मात्र बाकीचे खासदार कुठे होते? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
MVA Leaders PC: उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर
दरम्यान, गुजरात निवडणुकीतील विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करताना भाजपला टोला लगावला होता. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला देखील उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. “त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते अशी उत्तरं देत आहेत. संजय राऊत यांना उघड उघड धमक्या देत आहेत. तरी देखील आम्ही शांत बसायचं का?. आम्ही नेहमी जनते सोबत आहोत. नाणार येथील जनेतचा विरोध होत असल्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत होतो. वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्रात पाठवत आहेत. नाणार प्रकल्प तिथ नको असं म्हणणं होतं, मात्र दुसरीकडे प्रकल्प उभारण्यासाठी आमची अडचण नव्हती, यावर त्यांनी बोलावं, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.