HK Lohia: जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची हत्या

0

जम्मू,दि.४: HK Lohia: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वीच एक मोठा घटना उघडकीस आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सोमवारी रात्री उशिरा धक्कादायक घटना समोर आली. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया (Jammu Kashmir Police DGP Prision) यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या कृत्यामागे पोलिसांना त्यांच्या मदतनीसावर संशय आहे. सध्या हा मदतनीस फरार झाला असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी या मदतनीसाचा शोध सुरू केला आहे.

हेमंत लोहिया हे 1992 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शहराबाहेरील परिसरात असलेल्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्यांचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. लोहिया यांच्या घरातील मदतनीस फरार आहे. त्याच्या शोधासाठी काही पथके तयार करण्यात आली आहे. तर, लोहिया यांच्या घरी फॉरेन्सिक टीमने पाहणी केली.

पोलिसांना लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आले असल्याचे आढळून आले आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लोहिया यांच्या पायाला तेल लावले असल्याचे आढळून आले. त्यांचा पाय काहीसा सुजला होता. मारेकऱ्याने लोहिया यांना गुदमरून ठार केले. त्यानंतर केचअपच्या बॉटलच्या काचेच्या तुकड्याने त्यांचा गळा चिरला. गळा चिरल्यानंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here