MP Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

0

नवी दिल्ली,दि.24: MP Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. (Rahul Gandhi News Today) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टीका महागात पडली आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधींना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे. 

राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. या निर्णयानंतर आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, जर कोणत्याही परिस्थितीत खासदार आणि आमदारांना 2 वर्षांहून अधिकची शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभा) रद्द केले जाते. इतकेच नव्हे तर शिक्षेची मुदत पूर्ण केल्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणुका लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे सध्या त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 

काय आहे प्रकरण? | MP Rahul Gandhi

राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा प्रचारावेळी मोदींवर टीका करताना सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असा सवाल केला होता. याविरोधात गुजरातमधील मोदी समाजाने राहुल गांधींवर खटला दाखल केला होता. सुरतच्या सीजेएम कोर्टाने सकाळी 11 वाजता आपला निर्णय दिला आहे. 

या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने आयपीसीच्या कलम 504 अन्वये मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवले. आयपीसीच्या कलम 504 मध्ये दोषी आढळल्यास दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. न्यायालयाने निर्णय जाहीर केला असून राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल यांना लगेचच जामीनही दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here