सोलापूर,दि.२३: सोलापुरातील टेक्स्टाईल व गारमेंट उद्योगाच्या (Textile and Garment Industry) समस्या, सोलापूर स्मार्ट सिटी, मुंबई-सोलापूर दरम्यान वंदे भारत रेल्वे, किसान रेल्वे, सोलापूर जिल्ह्यास अध्यात्मिक पर्यटन केंद्र घोषित करणे, महाराष्ट्रातील पाचही जोतिर्लिंगांचा विकास करणे यासह इतर प्रकल्पांची सद्यस्थिती भविष्यात सोलापूरच्या विकासासाठी लागणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांची वेगाने सोडवणूक होण्यासाठी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी (Solapur MP Jay Siddheshwar Swami) पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (PM Narendra Modi) औपचारिक भेट घेत सविस्तर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपुलकीने सर्व विषयांची माहिती घेत सर्व विषयांवर लक्ष घालण्याची ग्वाही दिली.
सुरुवातीला खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी वाराणसीमध्ये झालेल्या दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
अधिवेशन काळात संसदेत सोलापूरच्या प्रश्नाबाबत मांडणी केली. तसेच सोलापुरातील टेक्स्टाईल व गारमेंट उद्योग अडचणीतून सामना करीत आहे. लॉकडाऊन व जीएसटी कारणाने वास्तोद्योग संकटात आहे. सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत काही प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. मुंबई-सोलापूरसाठी वंदे भारत रेल्वे मंजूर होणे अत्यावश्यक आहे. तसेच सोलापूर ते आगरतला, सोलापूर ते नागरकोइल किसान रेल्वेची मागणी आहे. सोलापूर जिल्ह्यास अध्यात्मिक पर्यटन केंद्र घोषित करून केंद्र सरकार तर्फे सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा. काशी प्रमाणे १२ ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रातील पाचही जोतिर्लिंगांचा विकास व्हावा, या विषयांवर चर्चा झाली.
यासह इतर प्रकल्पांची सद्यस्थिती भविष्यात सोलापूरच्या विकासासाठी लागणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांची वेगाने सोडवणूक होण्यासाठी औपचारिक भेट घेत खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी मोदींशी सविस्तर चर्चा केली.