खासदार बृजभूषण सिंह यांनी आपली भूमिका केली स्पष्ट, मनसेने शेअर केलेला फोटो

0

दि.२४: मनसेकडून शरद पवार (Sharad Pawar) आणि बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याबाबत सापळा रचण्यात आल्याचे सांगितले होते, मनसे कार्यकर्त्यांना अडकविण्यासाठी षडयंत्र करण्यात आल्याचे सांगितले होते. त्यासाठी अयोध्या दौरा रद्द केल्याचे सांगितले होते. त्यानंतर मनसेने बृजभूषण सिंह यांचा शरद पवारांसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यावर खासदार बृजभूषण सिंह यांनी आपली भूमिका केली स्पष्ट केली आहे.

भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आक्रमकपणे विरोध केला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि मगच अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी भूमिका बृहभूषण सिंह यांची होती आणि ते त्यावर अद्यापही ठाम आहेत. यातच मनसेने जारी केलेल्या फोटोबाबत बोलताना, होय, शरद पवार यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. याचा मला अभिमान आहे. आजही शरद पवार अयोध्येत आले, तर मी त्यांना प्रमाण करेन. माझ्यासाठी ते एक चांगले नेते आहेत. राज ठाकरे यांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे, असे सिंह यांनी नमूद केले. 

शरद पवार मोठे नेते

शरद पवार हे देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. मी कुस्तीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि शरद पवार हे महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे संरक्षक आहेत. हा कार्यक्रम तीन वर्षांपूर्वी पुण्यात झाला होता. कुठलाही कार्यक्रम असला, तरी ते पहिल्यांदा माझा सत्कार करायचे. मला माळा घालायचे. सत्काराचा एकही हार स्वतः त्यांनी कधी घालून घेतला नाही. कुस्ती क्षेत्रात जे काम झाले, ते माझ्यामुळे झाले, अशी भावना शरद पवार यांची आहे. सुशील कुमारचे ऑलिम्पिक मेडल असो किंवा योगेश्वर दत्त यांची कामगिरी, यामध्ये आमचा मोठा वाटा आहे, असे सिंह यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९शी बोलत होते. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here