MOTN: सर्व्हेक्षणात महत्वाची माहिती आली समोर, लोकसभेची आज निवडणूक झाल्यास…

0

सोलापूर,दि.27: MOTN: देशाचा राजकीय मूड समजून घेण्यासाठी आज तक, इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने एक सर्वेक्षण केले. ज्यामध्ये एकूण 1 लाख 40 हजार 917 जणांनी सहभाग घेऊन विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. ‘मूड ऑफ द नेशन’ (Mood Of The Nation) सर्वेक्षणात एनडीए सरकारच्या कारभारावरही प्रश्न विचारण्यात आले होते. आज लोकसभा निवडणूक झाल्यास जनतेने पुन्हा एकदा एनडीएला बहुमत दिले आहे. (MOTN Survey)

मोदी सरकारवर 67 टक्के लोक समाधानी | MOTN

9 वर्षे सत्तेत असलेल्या मोदी सरकारचे काम समाधानकारक असल्याचे 67 टक्के लोकांनी सांगितले. ऑगस्ट 2022 च्या सर्वेक्षणाच्या तुलनेत या आकडेवारीत 11 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार, 37 टक्के लोक एनडीएच्या कार्यपद्धतीवर असमाधानी होते, परंतु आता हा आकडा 18 टक्क्यांवर आला आहे.

…मोदी सरकारचे सर्वात मोठे यश मानले | MOTN Survey

सर्वेक्षणात 67 टक्के लोकांनी एनडीएची कार्यप्रणाली खूप चांगली असल्याचे सांगितले आणि 11 टक्के लोकांनी ते चांगले असल्याचे सांगितले. तर 18 टक्के लोकांनी वाईट म्हटले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईतील विजयाला लोकांनी मोदी सरकारचे सर्वात मोठे यश मानले आहे. 20 टक्के लोकांनी कोरोनाला सामोरे जाण्यात मोठे यश सांगितले आहे. कलम 370 हटवण्यासाठी 14 टक्के, राम मंदिर उभारणी 11 टक्के आणि जनकल्याण योजना 8 टक्केवारी देण्यात आली आहे.

देशात आज लोकसभा निवडणूक झाली तर…

देशात आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला 284 जागा, काँग्रेसला 68 आणि इतर पक्षांना 191 जागा मिळू शकतात असा अंदाज सर्व्हेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. मतदानच्या टक्केवारीबाबत बोलायचं झालं तर भाजपाला 39 टक्के, काँग्रेसला 22 टक्के आणि इतर पक्षांच्या खात्यात 39 टक्के मतदान होऊ शकतं.

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत…

लोकसभेच्या आता निवडणूका झाल्यास महाराष्ट्राचा विचार केल्यास या सर्व्हेक्षणातून भाजपा आणि शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेसाठी सी-व्होटरने एक सर्व्हेक्षण केले आहे. त्यानुसार आता लोकसभा निवडणूक झाल्यास यूपीएला एकूण 48 जागांपैकी (काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी) 34 जागा मिळू शकतात. म्हणजेच एकूण मतदानाच्या 48 टक्के मतदान यूपीएच्या खात्यात जाऊ शकते. आता निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी  आणि काँग्रेसला भरघोस यश मिळू शकेल, असे या सर्वेक्षणातून समोर येत आहे. त्यामुळे हा सर्व्हे एनडीएसाठी म्हणजेच भाजपा आणि शिंदे गटला मोठा धक्का ठरू शकतो.

नरेंद्र मोदींवर सर्वाधिक विश्वास…

पंतप्रधानपदी कुणाला पाहायला आवडेल यावर आजही जनतेनं नरेंद्र मोदींवर सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. मोदींच्या नावाला 52 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर 14 टक्के राहुल गांधी, 5 टक्के अरविंद केजरीवाल आणि 3 टक्के लोकांनी अमित शाह यांचं नाव घेतलं आहे. मात्र  वाढती महागाई हे मोदी सरकारचं मोठं अपयश जनतेनं मानलं आहे. यासाठी 25 टक्के लोकांनी महागाईवर मतदान केलं आहे. तर बेरोजगारीच्या मुद्द्याला 17 टक्के, कोरोना महामारीशी झुंज 8 टक्के आणि आर्थिक विकासाच्या मुद्द्याला 6 टक्के मतं मिळाली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here