Mohan Bhagwat: ‘तंत्रज्ञानाचा दुरुपयोग, खोटे पसरवणे अत्यंत चुकीचे’ मोहन भागवत

0

मुंबई,दि.11: Mohan Bhagwat: सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपा सरकारला मणिपूर हिंसेवरून सुनावले आहे. कुठल्याही प्रश्नावर दोन्ही बाजूंनी चर्चा व्हावी यासाठीच संसदेत दोन पक्ष आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग, खोटे पसरवणे अत्यंत चुकीचे आहे. असेही मोहन भागवत म्हणाले. (Mohan Bhagwat On Modi Government)

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. भाजपाला यावेळेला कमी जागा मिळाल्या आहेत. पंतप्रधानांचं नाव न घेता तरीही त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचवण्याच्या उद्देशानं सरसंघचालक मोहन भागवत यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं. 

काय म्हणाले मोहन भागवत?

मोहन भागवत यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर वर्षभरानंतरही अशांततेचीच परिस्थिती असल्यासंदर्भात चिंता व्यक्त केली. संघर्षामुळं प्रभावित झालेल्या देशातील या पूर्वोत्तर राज्यातील स्थितीविषयी प्राथमिकतेनं विचार केला गेला पाहिजे असं ठाम मत त्यांनी मांडलं. संघाच्याच एका सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशाच्या विविध भागांमध्ये आणि समाजामध्ये संघर्ष आणि अशांततेची स्थिती असणं योग्य नसल्याचा मुद्द अधोरेखित केला. 

निवडणुकीच्या धामधुमीतून आता बाहेर येऊन देशासमोर सध्या असलेल्या समस्या, प्रश्न यांच्यावर विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. निवडणुका संपल्या असून निकालही समोर आलेत. सरकारही बनले, सर्वकाही संपन्न झाले; परंतु यावर अद्याप चर्चा सुरु आहे. जे झाले ते का झाले, कसे झाले आणि काय झाले या गोष्टी म्हणजे लोकशाहीत प्रत्येक पाच वर्षात घडणाऱ्या घटना आहेत. आम्ही आमचे कर्तव्य करत आहोत, दरवर्षी करतो, प्रत्येक निवडणुकीत करतो. यावेळीही मी माझे कर्तव्यच करत आहे, असेही मोहन भागवत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here