बांगलादेशमधील हिंदूंचा उल्लेख करत सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठं वक्तव्य 

0

नागपूर,दि.15: सरसंघचालक मोहन भागवत यांनी बांगलादेशमधील हिंदूंचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत स्वातंत्र्यदिनी नागपूरच्या संघमुख्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण झाले पाहिजे. केंद्राने त्यांच्या पातळीवर पावले उचलावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्यांचा हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

शेजारच्या देशात उत्पात होतोय. हिंदूना त्रास दिला जातोय. आपण कधीच दुसऱ्यावर हल्ला केला नाही, दुसऱ्याला अडचणीत मदतच केली. मात्र, बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली. आज देशाला अभीष्टचिंतन करण्याचा दिवस आहे. केवळ चिंतन करून होत नाही.याच्याकरता मोठा संघर्ष करावा लागला.

1857 नंतर 90 वर्षाचा संघर्ष चालला. अनेक प्रकारच्या लोकांनी त्यात सहभागी झाले. आपल्या देशात प्रत्येक कोपऱ्यात स्वातंत्र्य नायक झाले.सामान्य व्यक्ती पण  स्वातंत्र्याकरता रस्त्यावर उतरला. अनेकजण जेलमध्ये गेले अनेक अनेकांना अनेकदा कारावास झाला. शक्तिनुरूप प्रत्येकाने सहभाग घेतला.बलिदान करणारा समूह आणि त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहणारा समाज त्यानंतर आपल्याला स्वतंत्रता मिळाल्याचे मोहन भागवत म्हणाले.  

भारताची परंपरा राहिली की आहे, आपण जगाच्या उपकाराकरता उभे राहतो. त्यामुळे आपण कधीच कोणावर आक्रमण केले नाही.जो संकटात होता त्याला मदतच केली. तो आपल्या सोबत कसा व्यवहार करतो हे बघितले नाही. जगभरातील पिडितांकरता आपण हे करतो. सरकार हे करत असते. शेजारील देशांमध्ये जी अस्थिरता आहे, त्यामुळे अनेकांना अराजकता झेलावी लागत आहे. त्या उत्पाताचा हिंदूंना त्रास होत आहे. त्यांना काही कष्ट होऊ नये, त्यांच्यावर काही अत्याचार होऊ नये, याची जबाबदारी एक देशाच्या नाते आपल्यावर आहेच. काही गोष्टी सरकारने आपल्या स्तरावरच कराव्या, असे सरसंघचालक म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here