Mohammed Shami: या पक्षाकडून मोहम्मद शमीला लोकसभेची उमेदवारीची अॅाफर

0

मुंबई,दि.8: Mohammed Shami: लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेला भाजपा पश्चिम बंगालमध्ये क्रिकेटच्या एका मोठ्या चेहऱ्याला उतरवू शकतो. पश्चिम बंगालमधून क्रिकेट स्टार मोहम्मद शमीला मैदानात उतरवण्याच्या शक्यतेवर भाजपा नेतृत्व विचार करत आहे. रणजी ट्रॉफीसाठी बंगालकडून खेळताना शमी एक वेगवान गोलंदाज म्हणून नावारुपाला आला. शमी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असला तरी आजही तो बंगालसाठी देशातंर्गत क्रिकेट खेळतो.

सूत्रांचे म्हणणे आहे की भाजप नेतृत्वाने मोहम्मद शमीला आधीच हा प्रस्ताव दिला आहे. मात्र, अंतिम निर्णय शमीला घ्यायचा आहे जो सध्या शस्त्रक्रियेनंतर क्रिकेटमधून विश्रांतीवर आहे.

भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमीला आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता आणि चर्चा सकारात्मक झाली होती. भाजपाच्या जवळच्या सूत्रांमध्ये अशीही चर्चा होती की शमीला मैदानात उतरवून भाजपा बंगालमध्ये अल्पसंख्याकांच्या जागेवर जिंकू शकेल.

भाजपाला बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून मोहम्मद शमीला उभं करायचं आहे. हा मतदारसंघ अतिसंवेदनशील आहे. ज्या संदेशखाली इथं अलीकडेच महिलांवर अत्याचाराची गंभीर घटना घडली तो भाग बसीरहाट लोकसभेचा आहे. या मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांची संख्या अधिक आहे. मोहम्मद शमीला या मतदारसंघातून निवडणुकीला उभं करणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरस्ट्रोक मानला जातो. 

शमीने वर्ल्ड कपमध्ये केली दमदार कामगिरी | Mohammed Shami

गेल्या वर्षीच्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 33 वर्षीय शमीने विश्वचषकात एकूण 7 सामने खेळले असून 24 विकेट्स घेतल्या आहेत. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या उपांत्य सामन्यात 57 धावांत 7 विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. 50 षटकांच्या विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय गोलंदाजाचा आतापर्यंतचा सर्वोत्तम विकेटचा विक्रम आहे. शमीने या स्पर्धेत तीन वेळा पाच विकेट घेतल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here