Modi 3.0: भाजपाकडेच राहणार ही मंत्रालय, हे नरेंद्र मोदींसोबत घेणार शपथ

0

नवी दिल्ली,दि.9: Modi 3.0: नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 7:15 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही शपथ घेणार आहेत. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संभाव्य यादी जाहीर झाली आहे. दरम्यान, टीडीपी नेते जयदेव गल्ला यांनी ट्विट केले आहे की, त्यांच्या पक्षाचे नेते राम मोहन नायडू मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील, तर पक्षाचे दुसरे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

भाजपाकडेच राहणार ही मंत्रालय | Modi 3.0

मिळालेल्या माहितीनुसार, संभाव्य मंत्री शपथ घेण्यापूर्वी पंतप्रधानांसोबत चहापानासाठी आले आहेत. सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, महत्वाचे म्हणजे, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) मध्ये समाविष्ट असलेली गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र ही चारही महत्वाची मंत्रालये भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याचे समजते. तर मित्रपक्षांना इतर खात्यांची जबाबदारी दिली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ते भाजप आणि मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या नेत्यांमध्ये अमित शहा, शिवराज सिंह चौहान, राजनाथ सिंह, किरेन रिजिजू, ज्योतिरादित्य सिंधिया, मनोहरलाल खट्टर, जयंत चौधरी आदी नेत्यांचा समावेश आहे. सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे की ज्यांना आज शपथ घ्यायची आहे त्यांना फोन येऊ लागले आहेत. संभाव्य मंत्र्यांच्या यादीत जेडीयूचे लालन सिंग, एचएएमचे जितन राम मांझी, एलजेपीचे चिराग पासवान या नेत्यांची नावे आहेत.

संभाव्य मंत्र्यांची यादी

अमित शहाभाजप
राजनाथ सिंहभाजप
नितीन गडकरीभाजप
पियुष गोयलभाजप
ज्योतिरादित्य सिंधियाभाजप
रक्षा खडसेभाजप
जितेंद्र सिंगभाजप
सर्बानंद सोनोवालभाजप
शिवराज सिंह चौहानभाजप
एस जयशंकरभाजप
किरेन रिजिजूभाजप
जी किशन रेड्डीभाजप
राजीव रंजन सिंगजेडीयू
रामनाथ ठाकूरजेडीयू
जीतन राम मांझीहम
चिराग पासवानएलजेपी
मोहन नायडूTDP
चंद्रशेखर पेम्मासानीTDP
राव इंद्रजीत सिंगभाजप
अनुप्रिया पटेलअपना दल
अन्नपूर्णा देवीभाजप
अश्विनी वैष्णवभाजप
प्रतापराव जाधवशिवसेना (शिंदे गट)
रामदास अठावलेभाजप
मनसुख मांडवियाभाजप


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here