भोंगा चित्रपट 3 मे रोजीच प्रदर्शित करण्याची मनसेची घोषणा

0

मुंबई, दि.21: राज्यात भोंग्यावरून वातावरण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली होती. यावेळी प्रथम राज ठाकरेंनी भोंग्याला विरोध दर्शवला होता. त्या नंतर राज ठाकरेंनी ठाण्यात ‘उत्तर सभा’ घेतली. यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्या नंतर 1 मेला औरंगाबाद येथे राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे.

राज ठाकरेंची सभा औरंगाबाद येथे होणार आहे. तत्पूर्वी 3 मे पर्यंत राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे हटविण्यासंदर्भात त्यांनी इशाराही दिला आहे. त्यावरुन, सध्या राज्यात चांगलंच राजकारण तापलं असून राज्यातील सर्वपक्षीय नेते राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त करत आहेत. मुंबई पोलिसांनी रात्री 10 ते सकाळी 6 लाऊडस्पीकरला बंदीही घातली आहे. आता, मनसेची या भूमिकेला आणखी जोर देत भोंगा चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 

राज ठाकरेंच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेची मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी, परवानग्या घेऊन आणि परवानग्या नाही मिळल्या तरी सभा घेणारच अशी भूमिका मनसेनं जाहीर केली आहे. त्यातच, आता मनचिसेचे अमेय खोपकर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी भोंगा हा चित्रपट रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी भोंग्यांसदर्भात 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर, दुसरीकडे 3 मे रोजीच भोंगा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणाही मनसेकडून करण्यात आली आहे.

”सन 2018 रोजी हा चित्रपट बनवून तयार झाला. या सिनेमाा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून आणखी जवळपास 10 अवॉर्ड मिळाले आहेत. हा चित्रपट धार्मिक नसून सामाजिक आहे. आता, 3 मे रोजी जगभरात हा चित्रपट प्रदर्शित होत असून मनेसकडून हा चित्रपट पाहण्याची विनंती सर्वांना करण्यात आली आहे. मनचिसेचे प्रमुक अमेय खोपकर यांनी या चित्रपटाचे पोस्टर्स रिलीज केले. यावेळी, चित्रपट पाहण्याची विनंती संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्यामुळे, या चित्रपटाच्या माध्यमातून मनसेचा भोंगा पुन्हा जोरात वाजणार असल्याचे दिसून येते. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here