Video: आमदार जमीर अहमद खान यांनी दलित संताच्या तोंडातील खालले अन्न

0

बेंगळुरू,दि.23: अलीकडच्या काळात धार्मिक तणाव निर्माण होताना दिसत आहे. दोन समुदायात अंतर निर्माण होत आहे. काँग्रेस आमदार जमीर अहमद खान (Congress MLA Zameer Ahmed Khan) यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते दलित समाजातील संत नारायण यांच्या तोंडातील अन्न खाताना दिसत आहेत. खरं तर, एका कार्यक्रमादरम्यान, बंगळुरूमधील काँग्रेस आमदार, जमीर खान यांनी, दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कट्टरपंथी घटकांवर निशाणा साधला आणि त्यांना कठोरपणे सुनावले.

यानंतर त्यांनी जवळच ठेवलेल्या ताटातील अन्न स्वतःच्या हाताने दलित स्वामींच्या तोंडात टाकले. त्याचवेळी स्वामींनी त्यांना ताटातून अन्न भरवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी नकार दिला आणि तोंडातून अन्न काढून खाऊ घाला असे सांगितले. त्यानंतर स्वामीजींनी तोंडातून अन्न काढून त्यांना खाऊ घातले. हे सर्व पाहून तेथे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून जमीर अहमदचे कौतुक केले.

प्रत्यक्षात चामराजपेठेत आंबेडकर जयंती-ईद मिलन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ज्यामध्ये अनेक लोक उपस्थित होते. रविवारी झालेल्या या कार्यक्रमादरम्यान, जमीर खान हे दोन समुदायांमधील तेढ कमी करण्याबद्दल बोलले आणि कट्टरपंथी घटकांना त्यांनी लक्ष्य करत टीका केली. त्याचवेळी सोशल मीडियावर काही लोक या व्हिडिओची खिल्ली उडवत आहेत. तर अनेकजण याला बंधुभावाचे उदाहरण म्हणत आमदाराचे कौतुक करत आहेत.

चार वेळा आमदार राहिलेले जमीर अहमद खान यांनी यापूर्वी अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार आणि अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here