पुणे,दि.25: शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे. यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसैनिकांमुळेच अनेकजण आमदार झाले आहेत. सामान्य शिवसैनिक दिवसरात्र मेहनत करतो म्हणूनच हे आमदार म्हणून निवडून येतात. ज्या शिवसैनिकांमुळे आमदार निवडून आले आहेत, त्यांना विचारात न घेता, ज्या जनतेनी मतदान केले त्यांना विचारात न घेता ही ठराविक मंडळी गद्दारी करत आहेत, अशी भावना शिवसैनिकांची झाले आहे.
त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेच्या 38 पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे. त्यामुळे शिंदें विरुद्ध उद्धव ठाकरे अशी स्थिती सध्या पहायला मिळत आहे. बंडामुळे आता शिवसेनेचे कार्यकर्तेही एकनाथ शिंदेवर नाराज झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केली आहे.