आमदारानी स्वतः श्रमदानातून केली 6 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती

0

दि.30 : आमदार म्हटले की स्टार्चचे कपडे चारचाकी गाडी असे चित्र निर्माण होते. अनेक आमदार हे लोकांना आवाहन करताना दिसतात. आश्वासने देतात, मात्र कधी आमदाराला रस्त्याची दुरुस्ती करताना ऐकले व पाहिले नसेल. आमदार जनतेला श्रमदानाचे महत्व सांगतात मात्र स्वतः श्रमदान करताना दिसत नाहीत. झारखंडमधील आमदारांनी पूर्ण वेळ श्रमदान करत 6 किमी रस्ता लोकांबरोबर बांधून काढला.

झारखंडमधील कोलेबिराचे आमदार नमन विक्सल कोंगडी यांनी आपल्या पदाचा गर्व दूर ठेवत स्वतः गावकऱ्यांसह श्रमदान केलं आणि मातीने भरलेल्या टोपल्या उचलून सहा किलोमीटरचा रस्ता दुरुस्त केला.

कोलेबिरा तालुक्यातील लोकांना त्यांच्या गावात जाण्यासाठीचा रस्ता खराब असल्याने फार अडचणींचा सामना कराला लागत आहे. आता थेट आमदारच श्रमदानासाठी उतरल्याने त्यांचं लोकांकडून फार कौतुक केलं जात आहे.

गावकऱ्यांनी हा रस्ता तयार करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे केली होती. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. दरम्यान झापला या गावात महिला आणि पुरुषांसाठी फुटबॉल सामन्याचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये आमदार नमन विक्सल कोंगडी यांना निमंत्रित केलं. त्यानंतर ग्रामस्थांच्या विनंतीवरून आमदारांनी श्रमदान सुरू केलं.

थेट आमदार नमन कोंगडी रस्त्यावर उतरून काम करू लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्ता बनवण्यासाठी आमदारांकडे मदत मागितली तेव्हा आमदारांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिलं.

श्रमदान करणाऱ्या सर्व लोकांसाठी आमदारांनी केवळ जेवणाची व्यवस्था केली नाही तर त्यांनी स्वतः मातीचा भार खांद्यावर घेऊन गावकऱ्यांसोबत श्रमदान केलं आणि रस्ता बांधला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here