आमदाराच्या कृतीने सर्वांचेच वेधले लक्ष, व्हिडीओ व्हायरल

0

जयपूर,दि.३: आमदाराच्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले असून त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. देशांतील ५ राज्यांत विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी आणि आजी-माजी उमेदवारही कामाला लागले आहेत. मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अनेक कसरती करण्यात येत आहेत. तसेच, विविध आश्वासने आणि अमिष देत जनतेला आपल्याकडे मतपरिवर्तित करण्याचा प्रयत्नही पाहायला मिळत आहे. त्यातच, राजस्थानमधील एका आमदाराच्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले असून त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ओम प्रकाश हुडला असं या आमदार महोदयांचं नाव असून ते अपक्ष आमदार आहेत.

दौसा जिल्ह्याच्या महवा विधानसभा क्षेत्रातील अपक्ष आमदार ओम प्रकाश हुडला यांनी चक्क रस्त्याच्या बाजुला ठाण मांडून लोकांच्या बुटांची पॉलिश केली. येथील एका बुट पॉलिश करणाऱ्या व्यक्तीच्या दुकानी जाऊन त्यांनी काही कार्यकर्ते व लोकांच्या बुटांची स्वत:च्या हाताने पॉलिश केली. यावेळी, ज्यांच्या बुटांची पॉलिश केली त्यांच्याकडून मजुरीही घेतली. त्यानंतर, ती सर्व रक्कम संबंधित दुकानदारास दिली. आमदार हुडला यांच्या या कृतीची मतदारसंघासह देशभरात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे बुट पॉलिश करतानाचा त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, गळ्यात फुलांच्या माळांचा ढिग असताना ते बुट बॉलिश करताना दिसून येतात.

जाती-भेदभाव संपुष्टात आणणे ही आपली प्राथमिकता आहे. मी आपल्या कार्यकर्त्यांना देव मानतो, त्यांनाच भाग्य विधाता मानतो. म्हणूनच, सर्वसामान्य कार्यकर्ता, गरीब व्यक्तींसाठी मी २४ तास कार्यरत आहे. त्यांसाठी सदैव सेवेत हजर आहे. त्यामुळेच, आज येथील दुकानात येऊन नागरिकांच्या बुटांची पॉलिश करुन मी त्यांचा सन्मान केला, असे हुडला यांनी म्हटले. आपल्या मतदारसंघात अनेक नेते जातीय भेदभाव निर्माण करत राजकारण करतात. मात्र, आपण सर्वच समाजाला सोबत घेऊन विकासाच नवीन आदर्शन निर्माण केल्याचेही हुडला यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here