सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर मंत्री नितीन गडकरी यांनी Amazon ला दिले हे आदेश

0

दि.9: सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती निधनानंतर मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी Amazon ला दिले आहेत. टाटाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे अपघाती निधन झाले. विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले. गेल्या काही दिवसांत दोन मोठ्या अपघातांनी केंद्र सरकारचे विशेषकरून नितीन गडकरींचे लक्ष वेधून घेतले आहे. विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांचा दणकट गाड्या असूनही अपघाती मृत्यू झाला होता. कारण ते मागच्या सीटवर बसले होते आणि सीटबेल्ट न बांधल्याने त्यांचे डोके आदळून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

या 54 वर्षीय सायरस मिस्त्री यांचे अचानक जग सोडून जाणे अतिशय दुःखद होते. आपल्या कारमध्ये मागे बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी बेल्ट न लावल्याने ते या अपघाताचे बळी ठरले, असे सांगितले जात आहे. तेव्हापासून सीट बेल्टच्या महत्त्वावर बरीच चर्चा झाली. दरम्यान, सरकारने शॉपिंग प्लॅटफॉर्म ॲमेझॉनसाठी आदेश जारी केला असून प्रोडक्टच्या विक्रीवरही बंदी घातली आहे.

तसे पाहता असे अपघात नेहमीच होत असतात, परंतु या दोन्ही व्यक्ती राजकीय दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या महत्तवाच्या असल्याने याकडे सर्वांचे लक्ष गेले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार कंपन्यांना कारमध्ये सहा सीटबेल्ट लावणे अनिवार्य केले आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. असे असले तरी आता सीटबेल्टवरून देखील गडकरींनी मोठे संकेत दिले आहेत. आता त्याचीही तयारी ऑटो कंपन्यांना करावी लागणार आहे. सरकार यासंबंधी आदेश जारी करणार आहे. यामुळे ज्या गाड्यांमध्ये सीटबेल्ट आहेत त्यांना सीटबेल्ट वापरावा लागणार आहे.

सध्या देशात ड्रायव्हरने सीटबेल्ट लावावा असा नियम आहे. त्याचीच पावती फाडली जाते. सुरक्षा हवी असेल किंवा जे जागरुक आहेत, ते सहप्रवाशाला देखील पॅसेंजर सीटबेल्ट वापरण्यास सांगतात. परंतु, सध्यातरी पाठीमागच्या सीटवर बसलेला व्यक्ती सीट बेल्ट वापरत नाही. या सीटवरील प्रवाशांनी सीटबेल्ट वापरले तर अनेकांचे जीव वाचतील. कारण हे सीटबेल्ट या मागच्या सीटवर बेसावध बसलेल्या व्यक्तींना सीटवरच बांधून ठेवतील आणि ते पुढे आदळणार नाहीत.

सरकारनं शॉपिंग प्लॅटफॉर्म ॲमेझॉनसाठी एक आदेश जारी केला आहे. तसंच एका प्रोडक्टच्या विक्रीवरही बंदी घातली आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर सीट बेल्टच्या महत्त्व अधिक चर्चा होत आहे. याच गोष्टीला पुढे नेत आता सरकारनं ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म ॲमेझॉनसाठी एक आदेश जारी केला आहे. गडकरींनी ॲमेझॉनला सीट बेल्ट अलार्म ब्लॉकर्सची विक्री थांवण्यास सांगितलंय.

गडकरींनी ॲमेझॉनला आपल्या साईटवरून अलार्म ब्लॉकर्सची विक्री थांबण्यास सांगितलं आहे. अनेक लोक ॲमेझॉनवर क्लिप्स खरेदी करतात, त्याचा वापर सीट बेल्टचा अलार्म बंद करण्यासाठी होतो, असं गडकरींनी वृत्तसंस्था रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. या प्रोडक्टची विक्री थांबवण्यासाठी त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

सध्याच्या तंत्रज्ञानानुसार पुढील सीटवर बसलेल्या व्यक्तींना सीटबेल्ट लावला नसेल तर अलार्म वाजत राहतो. आता मागच्या सीटवर देखील तशीच सोय केली जाणार आहे. हा नियम लागू झाल्यावर ज्या गाड्या रस्त्यावर येतील त्यात मागच्या सीटखाली वजनाचा सेन्सर असणार आहे. त्या सीटवर कोणी बसले आणि सीटबेल्ट लावला नाही तर अलार्म वाजत राहिल. याबाबतचा आदेश जारी होईल असंही गडकरी यापूर्वी म्हणाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here