MIM चे इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा तर मविआचे जागावाटप ठरले?

0

मुंबई,दि.17: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला निकाल लागणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात लढत होणार आहे. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची सातत्याने बैठक सुरू आहे. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या मविआ नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा तिढा सुटलेला आहे. तर MIM चे इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली आहे. याबाबत लोकमतने वृत्त दिले आहे.

विधानसभेसोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या पोटनिवडणुकीसोबतच ते छत्रपती संभाजीनगरमधून विधानसभा निवडणूकदेखील लढवणार आहेत. लोकमतशी बोलताना इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच छोट्या पक्षांमध्येही युतीची चर्चा जोरात सुरु झाला आहे. एमआयएमने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना युतीची ऑफर दिली आहे. इम्तियाज जलील यांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. अंतरवली सराटीमध्ये इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीला देखील बसू शकतो. 

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीपूर्वी मविआत 200 जागांवर एकमत झालं होते, विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील जागावाटप लवकर सुटावे यासाठी सकाळपासून मविआ नेते बैठकीला बसले आहेत. या बैठकीत  संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, सतेज पाटील  आणि इतर नेते उपस्थित आहेत. त्यात आतापर्यंत 260 जागांवर एकमत झाल्याचं सांगण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here