Spam Calls: मोबाईलच्या काेट्यवधी ग्राहकांना लवकरच मिळणार दिलासा

0

नवी दिल्ली,दि.२८: Spam Calls: मोबाईलच्या काेट्यवधी ग्राहकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मोबाईल ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र ग्राहकांना अनेकदा नकाेसे काॅल्स आणि एसएमएसमुळे त्रास होतो. माेबाइलवर येणारे नकाेसे काॅल्स आणि एसएमएसमुळे त्रस्त झालेल्या काेट्यवधी ग्राहकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण असे काॅल्स ब्लाॅक करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहे. ही यंत्रणा तुमच्या फाेनपर्यंत असे काॅल्स येऊच देणार नाही. नेटवर्कवरच काॅल्स फिल्टर हाेतील. १ मेपासून काही बदल हाेणार आहेत.

माेबाइल कंपन्या ‘एआय’वर आधारित स्पॅम फिल्टर लावणार | Spam Calls

प्राप्त माहितीनुसार, दूरसंचार विभागाने दिलेल्या निर्देशानुसार माेबाइल कंपन्या ‘एआय’वर आधारित स्पॅम फिल्टर लावणार आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नेटवर्क पातळीवरच नकाे असलेले काॅल्स ब्लाॅक हाेतील. सर्वसामान्यांच्या माेबाइलवर असे काॅल्स येणारच नाहीत. याशिवाय एसएमएससंदर्भातही अशाच प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. फसवणूक करणाऱ्या लिंक असलेले एसएमएसदेखील माेबाइलवर पाेहाेचणारच नाहीत.

अशी काम करेल यंत्रणा

  • या सेवेसाठी माेबाइल कंपन्यांना काॅमन यंत्रणेचा वापर करावा लागेल. 
  • विविध नेटवर्कवरून येणारे स्पॅम काॅल्स ब्लाॅक करण्यासाठी या यंत्रणेची मदत घेणार आहेत. 
  • कंपन्यांना ब्लाॅक केलेल्या क्रमांकांची 
    माहिती या यंत्रणेद्वारे कळवावी लागेल.

बॅंक, आधारसाठी 
वेगळे क्रमांक

  • ग्राहकांना बॅंकिंग सेवा, आधार व इतर अत्यावश्यक सेवांसाठी माेबाइल क्रमांक द्यावा लागताे. 
  • या सेवा पुरविणाऱ्यांना 
    वेगळ्या मालिकेतील क्रमांक देण्यात येतील. 
  • मालिका वेगळी असल्यामुळे हे क्रमांक ब्लाॅक हाेणार नाहीत.

माेबाइल ग्राहकांना दरराेज ३-४ स्पॅम काॅल्स अर्थात नकाे असलेले किंवा टेलिमार्केटिंगचे काॅल्स येतात.

सेबीचा  दणका

१ मेपासून हाेणाऱ्या दाेन प्रमुख बदलांमध्ये सेबीने ब्राेकर्ससंदर्भात दिलेल्या आदेशाचा समावेश आहे. 
स्टाॅक ब्राेकर्स व क्लिअरिंग मेंबर्सने ग्राहकांचे पैसे बॅंकांमध्ये गहाण ठेवण्यावर सेबीने बंदी घातली आहे. याचा ब्राेकर्सला दुहेरी फायदा हाेताे. मात्र, ग्राहकांची गुंतवणूक धाेक्यात येते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here