अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी असे काही सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आवरु शकले नाही हसू

0

दि.25 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात शुक्रवारी भेट झाली. पहिल्या भेटीत बायडेन यांनी ‘इंडिया कनेक्शन’ बद्दल सांगितलं. बायडेन आडनाव असलेल्या एका व्यक्तीबद्दल एक घटना सांगितली. ते म्हणाले की, ज्यानं 1972 मध्ये पहिल्यांदा सिनेटर म्हणून निवडून आले होते तेव्हा त्यांना एक पत्र लिहिलं होतं. या संदर्भात News 18 ने सविस्तर वृत्त दिले आहे.

News 18 च्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पहिल्या द्विपक्षीय थेट बैठकीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना सांगितलं की, त्यांनी भारतामध्ये बायडेन ‘आडनाव’ बाळगलेले आहेत हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे आणली आहेत. दोन्ही नेत्यांनी व्हाईट हाऊसमध्ये या विषयावर मजेदार पद्धतीने चर्चा केली. जेव्हा बायडेन यांनी विचारलं की, ते भारतात राहणाऱ्या बायडेन आडनाव असलेल्या लोकांशी संबंधित आहेत का, तेव्हा पंतप्रधान मोदींनी ‘होय’ असे उत्तर दिले.

पंतप्रधान मोदींनी जेव्हा म्हटलं की, त्यांनी भारतात राहणाऱ्या बायडेन आडनाव असलेल्या लोकांशी संबंधित कागदपत्रे आणली आहेत, तेव्हा बायडेन यांनी विचारलं की, माझा त्यांच्याशी संबंध आहे का?’ यावर पीएम मोदी म्हणाले, ‘होय’. ते म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष, तुम्ही आज भारतातील बायडेन आडनावाबद्दल विस्तृतपणे बोललात. यापूर्वीही तुम्ही माझ्याशी याविषयी चर्चा केली होती. तुम्ही उल्लेख केल्यानंतर मी कागदपत्रे तपासली. आज मी अशी अनेक कागदपत्रे सोबत आणली आहेत.

2013 मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना बायडेन मुंबईत असल्याची आठवण करून देत म्हणाले की, भारतात त्यांचे कोणी नातेवाईक आहेत का असे त्यांना विचारण्यात आलं. यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “मी म्हणालो की मला याबद्दल खात्री नाही, पण जेव्हा मी वयाच्या 29 व्या वर्षी 1972 मध्ये पहिल्यांदा निवडून आलो, तेव्हा मला ‘बायडेन’ आडनाव असलेल्या व्यक्तीचं मुंबईतून एक पत्र मिळालं होतं.

यावेळी त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेसनं मला सांगितलं की भारतात पाच बायडेन राहतात. हे अधिक तपशीलाने स्पष्ट करताना, बायडेन गंमतीनं म्हणाले. पुढे ते म्हणाले की, ईस्ट इंडिया टी कंपनीमध्ये कॅप्टन जॉर्ज बायडेन होते. जे एका आयरिश व्यक्तीला ते स्विकारणं कठीण होतं. मला आशा आहे की तुम्हाला विनोद समजला असेल. तो बहुधा तिथेच राहिला आणि त्याने एका भारतीय स्त्रीशी लग्न केलं.

बायडेन म्हणाले, “मी त्याला कधीच शोधू शकलो नाही, त्यामुळे या बैठकीचा संपूर्ण उद्देश मला तो सोडवण्यास मदत करणं हा आहे. यावर सभागृह पंतप्रधान मोदींसह बैठकीच्या खोलीतील सर्वांच्या हास्याने गजबजलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here